Join us

चक्क श्वेता शिंदेने केली महिलेची नॉर्मल डिलिव्हरी; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:12 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. लागिरं झालं जी, देवमाणूस अशा गाजलेल्या मालिका श्वेताने मराठी कलाविश्वाला दिल्या आहेत.
2 / 8
सोशल मीडियावर श्वेताची कायम चर्चा रंगत असते. यात खासकरुन तिच्या ग्लॅमरस लूक आणि बोल्डनेसची चर्चा होते.
3 / 8
यावेळी श्वेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे. एकदा श्वेताने चक्क भर रस्त्यात एका गरोदरबाईचं बाळंतपण केलं.
4 / 8
नवरात्री निमित्ताने श्वेताने प्लॅनेट मराठीच्या उत्सव आदिशक्तीचा या कार्यक्रमात या प्रसंगाविषयी भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यावेळी श्वेता स्वत: प्रेग्नंट होती.
5 / 8
'माझ्या समोरुन एक प्रेग्नंटबाई तिच्या सासू किंवा आई कोणासोबत तरी जात होती आणि तिला प्रसुती कळा येतायेत हे मला जाणवलं होतं. कारण, मी स्वत: त्यावेळी प्रेग्नंट होते. त्या दोघी तिकडून जात होत्या. पण मला एक कळलं की काही तरी गडबड आहे. त्या कुठे तरी जाऊन आल्या आणि ती तिथेच खाली रस्त्यात बसली. तिला लेबर पेन सुरु झालं', असं श्वेता म्हणाली.
6 / 8
पुढे ती म्हणते, 'त्यावेळी मला काहीच सुचेना. म्हणजे कुठून माझ्या अंगात शक्ती आली. लोकांनी मला ओळखू नये किंवा गर्दी उसळू नये यासाठी मी ज्या ठिकाणी बसले होते. तिथून मी उठले आणि बाहेर पडले आणि खूप बडबड केली. ते सरकारी हॉस्पिटल होतं आणि काही कारणामुळे तिला तिथे घेत नव्हते.'
7 / 8
'मी सगळ्या बायकांना गोळा केलं तिच्या भोवती फेर धरला आणि तिथे काहीही नसताना तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मी ते बाळ हातात घेतलं दगडाने मी त्याच्या नाळ ठेचली आणि त्याला माझ्या ओढणीमध्ये गुंडाळलं. पण, मला त्यावेळीही काहीच समजत नव्हतं. कारण, यापूर्वी मी कधीच असं काही केलं नव्हतं. आपण काही डॉक्टर नाहीये. मात्र, त्यावेळी ते माझ्या हातून घडलं. '
8 / 8
'यानंतर मी तिथल्या डॉक्टरांना भेटले, जाब विचारला त्यानंतर स्ट्रेचर आणला आणि त्या महिलेला अॅडमीट केलं. पण, डॉक्टर म्हणाले ही महिला वाचणार सुद्धा नव्हती तुम्ही कसं काय केलंत. मात्र, मी कसं केलं हे मलाही माहित नाही. या प्रकारानंतर माझी आई, माझ्या घरातलेही थक्क झाले होते.'
टॅग्स :श्वेता शिंदेसेलिब्रिटीटेलिव्हिजन