'आता स्वतःसाठी जग' म्हणत सिद्धार्थ चांदेकरनं लावलं आईचं दुसरं लग्न, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 1:38 PM1 / 8मराठी सिनेइंडस्ट्रीतला चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी नुकतेच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलीय. 2 / 8सिद्धार्थने स्वतः पुढाकार घेऊन आईचे दुसरे लग्न लावले. सिद्धार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनाही सोबती हवा या इच्छेतून त्याने आईचे दुसरे लग्न थाटामाटात लावून दिले आहे. 3 / 8सिद्धार्थ चांदेकरने घेतलेल्या या पुढाकारासाठी त्याचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. चाहतेच नाही तर कलाकार त्याचे सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.4 / 8अभिनेत्री मुक्ता बर्वेने कमेंटमध्ये लिहिले की, सुंदर. काकू अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. सिद्धार्थ तुला मोठी मिठी. तर प्रार्थना बेहरेने म्हटले की, वॉव..खूपच सुंदर. संपूर्ण कुटुंबाचे खूप अभिनंदन.5 / 8सखी गोखले हिने लिहिले की, अहहह खूपच छान. अभिनंदन सीमा मावशी. किती सुंदर आणि आनंदी दिसताहेत. वेल डन सिद्धू. खूप प्रेम आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर मधुराणी प्रभुलकरने म्हटले की, खूपच सुंदर. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. 6 / 8स्पृहा जोशीने म्हटले की, सिद्धू. त्या जगातील सर्व सुख उपभोगण्यास पात्र आहेत. अभिनंदन सीमा काकू. हेमंत ढोमेने लिहिले की, अभिनंदन सीम्स आणि सिद्धू तुचा खूप खूप अभिमान वाटतो. 7 / 8पर्ण पेठेने म्हटले की, खूप हृदयस्पर्शी. हे खूप जणांसाठी प्रेरणादायी आहे. तुझा खूप अभिमान वाटतो. खूप प्रेम काकू आणि कुटुंबाला. 8 / 8निवेदिता सराफ यांनी लिहिले की, हे खूप सुंदर आहे सिद्धार्थ. सीमाचे अभिनंदन आणि तिला तुझ्यासारखा मुलगा आहे, याचा मला खूप आनंद आणि कौतुक वाटतो. तू अप्रतिम आहेस. दोघांना खूप प्रेम. आणखी वाचा Subscribe to Notifications