Join us  

अप्सरेचे हे फोटो पाहिले नाहीत तर काय पाहिलं? सोनाली कुलकर्णी मिस करतेय मालदीव ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 3:43 PM

1 / 9
मराठीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली होती. तिच्या या मालदीव व्हॅकेशनचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.
2 / 9
पण सध्या काय तर सोनाली कदाचित मालदीव व्हॅकेशन मिस करतेय. या व्हॅकेशनचे आणखी काही नवे फोटो तिने शेअर केले आहेत.
3 / 9
निळ्या रंगाच्या स्वीम सूटमधील बीचवरचे काही अतिशय सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 9
निळ्याशार समुद्र किनारी सोनाली मस्तपैकी पोज देतेय. तिच्या या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.
5 / 9
कलर ब्लॉक बिकिनी आणि कव्हरअप सेटमध्ये सोनालीचा हा मोहक अंदाज पाहून अगदी कोणीही तिच्या प्रेमात पडेल.
6 / 9
लेस फ्लोरल हाय वेस्ट बिकिनी लूकमधील काही बोल्ड आणि फोटोही सोनालीने शेअर केले आहेत.
7 / 9
एका फोटोत ती सायकलवर मस्तपैकी भटकंती करताना दिसतेय. तिच्या या बोलक्या फोटोवरही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8 / 9
सोनालीच्या या फोटोतील तिच्या सुंदर डोळ्यांनी सर्वांनाच घायाळ केले आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने पुन्हा मालदीवला जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
9 / 9
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईत कुणाल बेनोडेकरोबत लग्नगाठ बांधली सोनाली आणि कुणाल लग्नानंतर त्यांच्या हनिमूनसाठी आफ्रिकेत गेले होते.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी