स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लडाखला गेली सोनाली कुलकर्णी, कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत म्हणते... By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 2:49 PM1 / 9अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लेह लडाखमध्ये आहे. नुकतेच तिने फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.2 / 9सोनाली कुलकर्णी हिने आज स्वातंत्र्य दिन कारगिर वॉर मेमोरियल येथे साजरा केला. तिथले फोटो तिने शेअर केले आहेत.3 / 9इतकेच नाही तर सोनालीने लडाखच्या रस्त्यावर बुलेट बाइक चालवून देशाचा झेंडा फडकावला आहे. 4 / 9सोनाली कुलकर्णी लडाखमध्ये तिच्या आईसोबत गेली आहे.5 / 9तिने कारगिल वॉर मेमोरियलचे फोटो शेअर करत लिहिले की, आज मला कारगिल वॉर मेमोरियल येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले…6 / 9अमर ज्योती यांना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर #टोललिंग टेकडी ओलांडून ९ किमी अंतरावर, आमचा आवाज एलओसीवर उपस्थित असलेल्या आमच्या सैनिकांपर्यंत पोहोचू द्या, असेही तिने लिहिले आहे. 7 / 9'भारत माता की जय' च्या घोषणा देताना अंगावर काटा उभा राहत असल्याचेही तिने सांगितले आहे. 8 / 9तिने पुढे म्हटले की, आणि टायगर हिल,रिने हिल, बत्रा हिल, द्रास, कारगिलवर, 1999 नंतर पुन्हा आपल्या देशाचा तिरंगा फडकवला गेला आहे, तो असाच उंच लहरत राहो. 9 / 9जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत तिने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications