PHOTOS : तिची अदा, करी फिदा...!! सोनाली कुलकर्णीचा साडीतील मोहक व सुंदर लुक By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 4:41 PM1 / 10पावसाळी वातावरण..हिरवळ, गारवा, बोगनवेल आणि साडी माझ्या काही आवडीच्या गोष्टी, असं सांगत सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत.2 / 10पिवळ्या-गुलाबी रंगाच्या साडीतील सोनालीच्या अदा काही औरच. 3 / 10सोनालीच्या या फोटोंवर चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. या पारंपरिक साडीमध्ये सोनालीचं रूप अगदी खुलून दिसत आहे.4 / 10पारंपरिक कपड्यांपासून ते वेस्टर्न आउटफिटपर्यंत, सर्वच प्रकारच्या कपड्यांमध्येसोनाली मोहकच दिसते. पण साडीमध्ये सोनालीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.5 / 10सोनालीने आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच स्टाइल स्टेटमेंटनेही चाहत्यांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.6 / 10मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांची अत्यंत लाडकी आहे. तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.7 / 10सोनालीने आजवर 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'क्लासमेट' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. 8 / 10'नटरंग' या चित्रपटातील सोनालीची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात सोनालीचं तिचं नृत्य कौशल्य प्रेक्षकांना भावलं होतं.9 / 10सोनालीच्या 'हिरकणी' चित्रपटातील भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. 10 / 10सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. आणखी वाचा Subscribe to Notifications