Join us

सिनेमाच्या सेटवर फुलली अशोक सराफ आणि निवेदिता यांची लव्हस्टोरी, दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 6:00 AM

1 / 11
अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहे. अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.
2 / 11
अशोक सराफ आणि निवेदिता या दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचा फरक असल्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. नंतर या दोघांनी लग्न केलं.
3 / 11
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात १८ वर्षांचे अंतर आहे. ते पत्नीपेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. अशोक सराफ यांचा दोन्ही घरचा पाहुणा हा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा निवेदिता सराफ फक्त ६ वर्षांच्या होत्या.
4 / 11
यानंतर निवेदिता यांनी देखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
5 / 11
काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली. ‘नवरी मिळेल नवऱ्याला’ चित्रपटात दोघांनी काम केले. चित्रपटात काम करताना त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
6 / 11
मात्र हे लग्न निवेदिता यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये, अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
7 / 11
या सगळ्यात निवेदिता यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली. त्यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले. या ठिकाणी लग्न करण्यामागे त्यांची दोन कारणे होती.
8 / 11
त्यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले. या ठिकाणी लग्न करण्यामागे त्यांची दोन कारणे होती.
9 / 11
पहिले म्हणजे मंगेशी हे सराफ यांचे कुलदैवत होते. तर दुसरे म्हणजे याच मंदिरामध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते.
10 / 11
अशोक आणि निवेदिता यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
11 / 11
निवेदिता सराफ सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत.
टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ