Join us  

अप्सरा अन् तिच्या सासूबाईंचं आहे खास नातं; पाहा कशा दिसतात सोनाली कुलकर्णीच्या सासूबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 7:00 AM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. उभ्या महाराष्ट्राची अप्सरा होत तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.
2 / 8
नटरंग, मितवा, धुरळा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यातच अलिकडे तिचा झिम्मा हा चित्रपटही प्रदर्शित झाला.
3 / 8
उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे सोनालीची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा असते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असतात.
4 / 8
कलाविश्वासह सोशल मीडियावर सक्रीय असलेली सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफशी निगडीत गोष्टीची चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 8
सोनाली अनेकदा तिचा पती कुणाल बेनोडेकर याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते सोनाली-कुणालने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.
6 / 8
सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या सासुबाईंची चर्चा रंगली आहे. सोनालीने तिच्या सासूबाईंसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
7 / 8
सोनालीच्या सासूबाईंचं नाव छाया बेनोडेकर आहे. अलिकडेच सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये तिच्या सासूबाईंची चर्चा रंगली.
8 / 8
छाया बेनोडेकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्यापैकी कूल असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोनालीसोबतच काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसिनेमासेलिब्रिटी