ये दोस्ती हम नहीं तोडेंगे ! कुशल बद्रिकेचा मराठी सिनेसृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक आहे बेस्ट फ्रेंड By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 1:28 PM1 / 8उत्तम अभिनयशैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike) . आजवरच्या कारकिर्दीत कुशलने प्रेक्षकांचं कमालीचं मनोरंजन केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 8कुशलने काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र, यात बऱ्याचदा त्याच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आल्या. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 8कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. कुशलने मराठी सिनेसृष्टीतील त्याच्या बेस्ट असणाऱ्या अभिनेता आणि दिग्दर्शकासाठी ही पोस्ट लिहिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यापैकीच एका जोडीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 8ही जोडी आहे अभिनेता कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक- अभिनेते विजू माने यांची. आज विजू माने यांचा वाढदिवस आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 8कुशल अनेकवेळा विजू माने यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांच्यातील निखळ मैत्री चाहत्यांदेखील भावते. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 8विजू माने यांच्या वाढदिवसा निमित्त कुशालने खास पोस्ट लिहित त्यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केलेत. ''मी लिहिलेल्या ओळींमध्ये ज्यांना कधीच “गाणं” दिसत नाही, पण त्या ओळींची आज ना उद्या एखादी “कविता” होईल प्रयत्न करत रहा कुश्या ! असं कायम प्रोत्साहन देणाऱ्या मित्राचा आज बर्थडे.'' (फोटो इन्स्टाग्राम)8 / 8''मी घर घेण्यापासून, ते घरातला बल्प गेलाय तो बदलून द्या पर्यंत, आणि “सिनेमाच्या प्रीमियरला” घालायला कपडे घेऊन द्या, पासून ते कपडे दिलेत! आता मला घेऊन “सिनेमा” करा आणि त्याचा ” प्रीमियर” करा पर्यंत मी ज्यांच्याकडे काहीही मागू शकतो, अशी एक हक्काची जागा म्हणजे “विजू माने” कधी कधी तर मला वाटतं “विजू माने” उर्फ “विमा” देवाने हा माझ्या आयुष्यभराचा “विमा” आधी काढला मग मला जन्माला घातलं. फक्त “प्रेमाचं” प्रिमीयम मात्र कमी पडू द्यायचं नाही. आपल्या मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. हिच बाप्पांच्या आणि गुरूजींच्या चरणी प्रार्थना.'' तटी :- (आज तुमच्या वाढदिवसानिमित्त कविता करत नाही हेच बर्थडे गिफ्ट समजा) अशी पोस्ट कुशलने लिहिलीय. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications