नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:01 PM1 / 7बिग बॉस मराठी फेम कपल अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत निसर्गरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला.2 / 7प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता. 3 / 7अमृता-प्रसादच्या लग्नाला कलाविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर चाहत्यांनी प्रसाद आणि अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.4 / 7नुकतंच अमृताने लग्नातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे नवविवाहित जोडपं खूपच खास दिसत आहे. तसंच अमृताने फोटोंना छान कॅप्शन दिलं आहे.5 / 7नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही..या गाण्यांच्या ओळी तिने कॅप्शनमध्ये दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवरही चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 7'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. 7 / 7घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications