"तू हिच्याशी लग्न केलंस का असं जेव्हा..." आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी सलील कुलकर्णी यांचं भाष्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 4:08 PM1 / 8मराठी संगीतकार सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni)यांना नुकताच 'एकदा काय झालं' या मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा त्यांचा दुसराच दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. 2 / 8सलील कुलकर्णी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २०१३ मध्ये सलील यांचा घटस्फोट झाला. इतकंच नाही तर त्यांचं नाव नवोदित गायिकांसोबत जोडलं गेलं होतं. या कठीण काळाविषयी ते पहिल्यांदाच 'मित्र म्हणे' या युट्यूब पॉडकास्टवर मोकळेपणाने बोलले आहेत. 3 / 8सलील कुलकर्णी म्हणाले, 2013 मध्ये जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा ज्या पद्धतीने लोकं यासगळ्याकडे बघतात ते मला पटलं नाही. एक बाप त्याच्या ६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा यांना वाढवायचं प्रयत्न करतोय. तर त्याला किमान त्रास देऊ नये. इतका समजूतदारपणा लोकांमध्ये का नाही?4 / 8या समजूतदारपणावरही मला अनेकदा पिक्चर करावासा वाटतो किंवा बोलावंसं तरी वाटतं. मी अजिबात चिडून किंवा त्रागा करत नाहीए पण खूप मोठे मोठे शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकांपासून, ज्येष्ठ नागरिक असतील आंधळेपणाने गॉसिप करताना मी त्याकाळात बघितलं आहे. 5 / 8 मला तोंडावर येऊन विचारलं, अरे तू त्या हिच्याशी लग्न केलंस का? ही वृत्ती मला खरोखर अपघात होऊन रस्त्यावर पडलेल्या माणसाचं घड्याळ आणि अंगठी काढून घेण्याचीच वाटते. तुम्ही मदत नका करु पण त्याला त्याचं त्याचं लढू दे ना. पण लोकं गॉसिप एन्जॉय करतात. 6 / 8संदीप खरेंनी लेख लिहिला होता. त्याला जगू द्या तो त्याच्या मुलांना सांभाळतोय, त्याने लग्न केलंच तर तो जाहीर करेल. मी हॉटेलमध्ये गेल्यावरही कुजबूज ऐकू यायची. 7 / 8२०१३ नंतरचा मी हा मला खूप आवडणारा मी आहे. मी प्रत्येक कामावर, मिनिटावर जीव लावला. कारण मला माहित होतं की हा कार्यक्रम झाल्यावर मला घरी जायचंय मुलांचा अभ्यास घ्यायचाय. 8 / 8मी त्या काळात मुलांना सुद्धा गॉसिपविषयी सांगायचो. ई..काहीही काय अशी माझ्या मुलीची प्रतिक्रिया होती. पहिलीतल्या मुलीला जर हे कळतं तर तुम्हाला का नाही कळत? आणखी वाचा Subscribe to Notifications