Join us  

अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 3:28 PM

1 / 9
तिने वेगवेगळ्या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
2 / 9
अलिकडे अभिनेत्री 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. त्यामधील 'मंगळागौर' हे गाणं तिने लिहलं आहे.
3 / 9
सोशल मीडियावर अदितीचा दांडगा वावर आहे. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
4 / 9
सध्या अदिती तिच्या आई-वडिलांसोबत साताऱ्यातील कास पठारावर व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
5 / 9
त्याचे काही खास फोटो तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
6 / 9
निसर्गरम्य परिसर, चहुबाजुला दाट, हिरवीगार झाडी शिवाय त्यात पावसाची संततधार आणि धुक्याची चादर असं निर्सगाचं वरदान लाभलेल्या कास पठारावर अदितीची आपल्या कुटुंबियांसोबत भ्रमंती सुरु आहे.
7 / 9
'Thankful for August' असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
8 / 9
अदितीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.
9 / 9
'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
टॅग्स :अदिती द्रविडसाताराकास पठारटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्