मुस्कुराहट है हुस्न का जेवर, मुस्कुराना न भूल जाया करो...अप्पूच्या इंडोवेस्टर्न लूकवरून नजर हटेना By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 4:03 PM1 / 7छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका म्हणून ‘ठिपक्यांची रांगोळी’ ओळखली जाते. या मालिकेतील अप्पू आणि शशांकच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.2 / 7'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलून घेतलं होतं. या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साकारलेली अप्पूची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली. 3 / 7स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसारित होणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आजही प्रेक्षकांमध्ये या मालिकेची क्रेझ पाहायला मिळते.4 / 7या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. 5 / 7नुकतेच ज्ञानदा रामतीर्थकरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या इंडोवेस्टर्न लूकमध्ये ज्ञानदा फारच सुंदर दिसतेय.6 / 7या फोटोला तिनं Cute & Sizzling… All At Once! असं कॅप्शन दिलं आहे. ज्ञानदानं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 7 / 7'Wow अप्पू किती भारी दिसते तु' अशी कमेंट ज्ञानदानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं दिली आहे. फोटोंमधील ज्ञानदाचा बोल्ड आणि हटके अंदाज चाहत्यांना भलताच भावलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications