1 / 12अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘लागिर झालं जी’ या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतरही ती प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.2 / 12या मालिकेतील अजिंक्य, शीतल, जयडी, मामी, जिजी या भूमिका विशेष गाजल्या. त्यातही जयडी आजही सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.3 / 12या मालिकेमध्ये अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने जयडीची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर पूर्वा अनेक मालिकांमध्ये झळकली. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची सतत चर्चा होत असते.4 / 12सामान्य कुटुंबातून आलेली पूर्वा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.5 / 12बोल्ड वा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येणारी पूर्वा यावेळी कोणत्याही फोटोमुळे नव्हे तर तिच्या सख्या बहिणीमुळे चर्चेत येत आहे.6 / 12पूर्वाप्रमाणेच तिची सख्खी बहिणीदेखील सुंदर दिसते. मात्र, ती सोशल मीडियापासून थोडी दूर असल्याचं पाहायला मिळतं.7 / 12पूर्वा अनेकदा तिच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात.8 / 12पूर्वाच्या बहिणीचं नाव मानसी शिंदे असं आहे. या दोघी बहिणींमध्ये प्रचंड चांगलं बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळतं.9 / 12मानसी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, पूर्वा किंवा तिच्या आईच्या सोशल मीडिया पोस्टमधून कायम तिला पाहायला मिळतं.10 / 12मानसी खऱ्या आयुष्यात जरी ग्लॅमरस असली तरीदेखील प्रसारमाध्यमांपासून ती दूर राहण्याचा प्रयत्न करते.11 / 12मानसीचे काही फोटो तिच्या आईच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात.12 / 12पूर्वा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने लागीर झालं जी, युवा डान्सिंग क्वीन, चला हवा येऊ द्या, घेतला वसा टाकू नको, आई माझी काळुबाई आणि जीव माझा गुंतला या मालिकांमध्ये काम केलं आहे.