IN PICS : 5 स्टार हॉटेलात शाही पक्वान्न पाहून रडू लागला..., 'मास्टर शेफ' जज विकास खन्नाची स्ट्रगल स्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 3:18 PM1 / 15‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती,’ ही गोष्ट जगप्रसिद्ध शेफ विकास खन्नानं अगदी खरी करून दाखवली.2 / 15आज जगातील सर्वांत हँडसम व फेमस शेफ म्हणून विकास खन्ना ओळखला जातो. लवकरच तो ‘मास्टर शेफ इंडिया’ हा लोकप्रिय कुकिंग शो जज करताना दिसणार आहे.3 / 15या जजच्या आयुष्याची कथा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जन्मत: विकास दिव्यांग होता.4 / 15बालपणी जेव्हा बहुतेक मुले कोणत्या ना कोणत्या खेळात गुंतलेली असत, त्यावेळी 6 वर्षाचा विकास शेतापासून दूर स्वयंपाकघरात आपल्या आयुष्याची स्वप्ने बघत होता.5 / 15 14 नोव्हेंबर 1971 रोजी अमृतसर येथे जन्मलेला विकास खन्ना जन्म झाला तेव्हा अपंग होता. त्यामुळे तो आपल्या पायावर नीट उभं राहू शकत नव्हता. यामुळेच तो तासन् तास स्वयंपाक घरात आई आणि आजीसोबत बसायचा. 6 / 15विकासने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, माझ्या पायात काहीतरी अडचण होती. त्यामुळे मी सामान्य मुलांसारखं ना धावू शकायचो, ना नीट चालू शकायचो.7 / 15पुढे त्याने सांगितलं होतं, लहानपणी अनेक लोक माझी खिल्ली उडवायचे. पण माझी आई नेहमी म्हणायची, माझा मुलगा पळू शकत नाही, कारण त्याचा जन्म उडण्यासाठी झाला आहे.8 / 15 लहानपणी त्यांची आजी अमृतसरच्या एका छोट्या गल्लीत पराठे बनवायची आणि विकास आईसोबत मिळून हे पराठे विकायचा9 / 15विकासने वयाच्या 17व्या वषार्पासून काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम विकासने त्याच्या घराच्या मागे एक छोटा बँक्वेट हॉल उघडला. मात्र त्याला यश आलं नाही.10 / 15त्याला छोले भटूरे बनवायला यायचे. पण आयुष्यात त्याने कधी केक पाहिला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा मुंबईत आल्यावर एकदा एका 5 स्टार हॉटेलातील शाही पक्वानं बघून तो रडू लागला होता.11 / 15मी आयुष्यात कधीच इतकं सुंदर जेवण, इतकी पक्वानं बघितली नाही, असं म्हणत तो रडत होता. इथूनच त्याच्यात नवनव्या डिशेज बनवण्याची आवड निर्माण झाली.12 / 15विकासने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ते अमेरिकेत गेले होते, तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. विकासने अनेक रात्री रस्त्यावर आणि स्टेशनवर झोपून काढल्या, भांडी धुण्यासारखी कामेही करावी लागली.13 / 15विकासला न्यूयॉर्कमधील ‘सलाम बॉम्बे’ या रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी त्याला एका शोमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं. अशाप्रकारे प्राइम टाईमला टीव्हीवर येणारा तो पहिला भारतीय शेफ ठरला.14 / 15 राजेश भारद्वाज आणि त्याने मिळून 2010मध्ये न्यूयॉर्कमध्ये विकासचं स्वप्न असणारं ‘जुनून’ रेस्टॉरंट उघडले आणि आज ते अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे.15 / 15अमेरिकेत सुरुवातीच्या काळात अनेक रात्री रस्त्यावर आणि स्टेशनांवर झोपून काढणाऱ्या विकास खन्नाच्या नावावर आज पाच मिशेलिन पुरस्कार आहेत. 2011 मध्ये, विकासला पीपल्स मॅगझिनने अमेरिकेतील सर्वात सेक्सी आणि हॉट शेफ घोषित केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications