Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यशच्या खऱ्या आयुष्यातील नेहा आणि परीला पाहिलंत का?, पत्नी दिसते लयभारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 6:00 AM

1 / 9
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसतो आहे आणि त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे. श्रेयस तळपदेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
2 / 9
श्रेयस तळपदेच्या पत्नीचे नाव आहे दीप्ती तळपदे आणि या दोघांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.
3 / 9
श्रेयस तळपदे ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेत निशांत महाजनची भूमिका साकारत होता. या मालिकेमुळे श्रेयसला खूप लोकप्रियता मिळाली होती.
4 / 9
याच लोकप्रियतेमुळे त्याला विनायक गणेश वझे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी जीएस या पदावर दीप्ती देशमुख कार्यरत होती.
5 / 9
दीप्तीने श्रेयसला फोनवरून आमंत्रित केले होते दरम्यान दोन ते तीन वेळा त्यांचा फोनवरून संवाद देखील झाला होता. हा कार्यक्रम पार पडण्याआधी दीप्ती तिच्या काही मैत्रिणींसोबत श्रेयसच्या घरी त्याला निमंत्रण देण्यासाठी गेल्या होत्या. दीप्तीला पाहताच श्रेयस पहिल्या नजरेत तिच्या प्रेमात पडला.
6 / 9
त्यानंतर कॉलेजमध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतरही त्याची नजर तिच्याकडे खिळून राहिली होती. कार्यक्रम संपल्यावर दोघांनी एकमेकांना निरोप देखील दिला. मात्र श्रेयसच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते आणि शेवटी अवघ्या पाच दिवसात तो दीप्तीला भेटला. इतकेच नाही तर माझ्याशी लग्न करशील का? असे म्हणत प्रपोज केले.
7 / 9
श्रेयसने प्रपोज करताच दीप्तीला धक्का बसला. एवढ्यात लग्नाचा विचार केला नसल्याचे सांगत आणि अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी जावे लागणार या विचाराने तिने श्रेयासला साफ नकार दिला होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि दोघेही पुन्हा एकत्र भेटू, बोलू लागले.
8 / 9
दरम्यान दीप्तीचे अमेरिकेला जाणेही टळले शेवटी दोन ते अडीच वर्षांनी दीप्तीने श्रेयसला होकार दिला. मानसशास्त्र तज्ञ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर दिप्तीने श्रेयसबाबत घरच्यांना सांगितले तेव्हा घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली.
9 / 9
३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे लग्न पार पडले. श्रेयस आणि दीप्ती यांना एक मुलगी आहे, जिचे नाव आद्या आहे.
टॅग्स :श्रेयस तळपदे