'माझ्या नवऱ्याची बायको' फेम गुरूनाथ उर्फ अभिजीत खांडकेकरची रिअल लाईफमधील पत्नी आहे खूप सुंदर, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:30 IST
1 / 7झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरने रसिकांच्या मनात आपल्या अभिनय कौशल्यानं घर केलंय. अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा हीदेखील अभिनेत्री असून ती खुप सुंदर दिसते.2 / 7सुखदा सोशल मीडियावर सक्रीय असून ती वेस्टर्न व ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर करत असते.3 / 7अभिजीतची खऱ्या आयुष्यातील पत्नी सुखदा खांडकेकरदेखील अभिनेत्री आहे. तसेच ती कथ्थक नृत्यांगणादेखील आहे. 4 / 7अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत प्रेमविवाह केला आहे. अभिजीत व सुखदा दोघेही मुळचे नाशिकचे आहेत.5 / 7हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.6 / 7संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. 7 / 7सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.