दीक्षित सिस्टर्स!! माधुरीच्या दोन सख्ख्या बहिणींना कधी पाहिलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 1:05 PM1 / 10आपल्या सौंदर्याच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित .2 / 10गेल्या कित्येक वर्षांपासून माधुरी तिच्या निखळ हास्यामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच आजही ती धकधक गर्ल या नावानेच ओळखली जाते.3 / 10कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली माधुरी कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.4 / 10माधुरी वरचेवर तिच्या कुटुंबीयांसोबतचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यात अनेकदा तिच्या पती वा मुलांसोबतचे असतात.5 / 10अनेकदा माधुरी तिच्या आईसोबतचेही फोटो शेअर करत असते. माधुरीची आई तिच्यासोबतच तिच्या घरी राहते.6 / 10अलिकडेच माधुरीने मदर्स डे निमित्त एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पहिल्यांदाच तिच्या दोन्ही बहिणी एकत्र दिसून आल्या.7 / 10माधुरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई आणि दोन बहिणींसह दिसून येत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.8 / 10माधुरीला दोन सख्ख्या बहिणी आहेत. यात एकीचं नाव रुपा आहे. तर, दुसरीचं नाव भारती असं आहे. तसंच त्यांना एक भाऊदेखील आहे.9 / 10माधुरीच्या दोन्ही बहिणी कथ्थक डान्सर आहेत. मात्र, तरीदेखील त्या कलाविश्वापासून दूर असून त्यांच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.10 / 10 'मी जी काही होते, आहे आणि जी काही असेन ते फक्त तुझ्या सावलीमुळेच. हॅप्पी मदर्स डे', असं कॅप्शन देत माधुरीने आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications