Join us

२६ वर्षांनी लहान मुलीशी लग्न, आता दोघंही देतात 'फिटनेस' गोल्स; हँडसम मिलिंद सोमणची Love Story

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:05 PM

1 / 8
९० च्या दशकातील मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) याही वयात अत्यंत फिट आहे. कित्येक किलोमीटर अंतर तो पळत पार करतो. त्याच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात.
2 / 8
या प्रवासात मिलिंद एकटा नाही तर त्याच्या बायकोची त्याला उत्तम साथ मिळते. त्याची बायको अंकिता कोनवार (Ankita Konwar) ही त्याच्याहून तब्बल २६ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांचं लग्न हा कायम चर्चेचा विषय ठरला. 2018 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. नुकताच त्यांनी लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला.
3 / 8
मिलिंद आणि अंकिता ची ओळख नेमकी कशी झाली? तर दोघेही एका नाईट क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले. पहिल्याच नजरेत मिलिंदला अंकिता आवडली. तर अंकिताही मिलिंदमुळे प्रभावित झाली होती. नंतर दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवू लागले.
4 / 8
एव्हाना दोघेही एकमेकांचे अगदी घट्ट मित्र झाले होते.अंकिताचा तेव्हा एक बॉयफ्रेंड होता मात्र अचानक त्याचा मृत्यू झाला. यामुळे अंकिता पूर्णपणे कोसळली होती. अशावेळी मिलिंदने तिला आधार दिला. मात्र तो तिच्या प्रेमातच पडला.
5 / 8
दोघांच्या वयात मोठं अंतर असतानाही ते कधीच त्यांच्या नात्यात अडथळा बनलं नाही. त्यांच्या प्रेमाला कशाचीही सीमा नव्हती. फिटनेस हा दोघांच्याही आयुष्यातील महत्वाचा भाग असल्याने त्यांची जोडी जमली.
6 / 8
काही वर्षांनी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2018 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी अलिबाग येथे मराठी रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले.
7 / 8
मिलिंद आणि अंकिताचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसंच जगाच्या कानाकोपऱ्यात ते मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात. त्याचेही अनेक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर दिसतील.
8 / 8
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंदने याआधी 2006 मध्ये मेलिन जॅपनोई या फ्रेंच मॉडेलसह लग्न केलं होतं. मात्र 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवरफिटनेस टिप्सलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट