PHOTOS: प्लास्टिक सर्जरी फसली अन् बर्बाद झाले या बॉलिवूड अभिनेत्रीचे करिअर, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:30 PM1 / 10बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram) 2 / 10कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट ऑफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. (Photo Instagram) 3 / 102008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. (Photo Instagram) 4 / 10यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सारख्या सिनेमांतही ती झळकली. (Photo Instagram) 5 / 10पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. (Photo Instagram) 6 / 102005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता (Photo Instagram) 7 / 10प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. (Photo Instagram) 8 / 10२०१७ मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. (Photo Instagram) 9 / 10सोशल मीडियावर ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram) 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications