Join us

स्टुडिओबाहेर जमिनीवर झोपायचा; १२ वर्षांच्या संघर्षानंतर 'या' अभिनेत्याला मिळाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 6:28 PM

1 / 10
बॉलिवूडमधील कलाकारांना आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया, ज्याला १२ वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली.
2 / 10
'मिर्झापूर' नंतर स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अंजुम शर्मा. ज्याने 'शरद शुक्ला' ही व्यक्तिरेखा साकारली आणि लोकांची मनंही जिंकली. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्याने रात्रंदिवस मेहनत केली आहे.
3 / 10
अंजुम शर्मा हा दिल्लीचा रहिवासी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. तो लहानपणीच मुंबईत राहायला आला होता. येथे त्याने सुरुवातीला अभिनेता होण्याचा विचार केला नव्हता.
4 / 10
अंजुम शर्माने त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि नंतर त्याने आनंद एल राय यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याने आठ वर्षे थिएटरही केलं.
5 / 10
अंजुमला त्यानंतर अभिनयात यावंसं वाटलं. १२ वर्षांच्या संघर्षानंतर अंजुम शर्माला 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. येथून त्याचं नशीब चमकलं. या चित्रपटाने ८ ऑस्कर जिंकले.
6 / 10
एकदा एका पॉडकास्टमध्ये अंजुमने त्याच्या संघर्षकथेबद्दल मोकळेपणाने सांगितलं होतं. अभिनेत्याने सांगितलेलं की, आज त्याला इंडस्ट्रीत चांगली ओळख मिळाली आहे. पण एक काळ असा होता की, तो स्टुडिओबाहेर जमिनीवर पेपर टाकून झोपायचा.
7 / 10
काम मिळवण्यासाठी दारोदारी भटकावं लागलं असल्याचं अभिनेत्याने सांगितलं होतं. त्यानंतर त्याला कंगना राणौतच्या 'तनु वेड्स मनू' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
8 / 10
अभिनेत्याने हे गुपित देखील उघड केलं होतं की, त्याला 'मिर्झापूर'मध्ये शरद शुक्लाची नव्हे तर मुन्ना भैय्याची भूमिका करायची होती. ज्यासाठी त्याने ऑडिशनही दिलं होतं. पण नंतर शरद शुक्लासाठी नाव फायनल करण्यात आलं.
9 / 10
'मिर्झापूर ३' मध्ये अभिनेत्याची भूमिका खूप मोठी होती. मात्र, शेवटी कालीन भैया त्याच्यावर गोळी झाडतो. अशा परिस्थितीत पुढच्या भागात अंजुमची भूमिका असेल की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
10 / 10
टॅग्स :बॉलिवूड