PHOTOS : रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे ‘मिर्झापूर’ची ‘गोलू गुप्ता’, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 4:16 PM1 / 10‘मसान’ या चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिला सगळे गोलू नावानं ओळखतात.2 / 10 होय, ‘मिर्झापूर’ सीरिजमधील ही गोलू खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. तिचे इन्स्टावरचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.3 / 10‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये श्वेता त्रिपाठी अतिशय सिंपल लुकमध्ये दिसली होती. पण रिअल लाईफमध्ये ती प्रचंड बोल्ड, ग्लॅमरस व बिनधास्त आहे. 4 / 10‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये श्वेता त्रिपाठीची भूमिका छोटी होती. पण दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू भैय्यासोबत मिळून तिने मुन्ना व कालिन भैय्याला हादरवून सोडलं होतं.5 / 10श्वेता त्रिपाठ ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती रोज ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.6 / 10तिचे फोटो बघता, हीच ‘मिर्झापूर’ची गोलू आहे यावर क्षणभर विश्वास बसत नाही. सध्या श्वेता ‘मिर्झापूर 3’ची तयारी करतेय. लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.7 / 10कदाचित तुम्हाला माहित नसेल पण श्वेता ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पी. के. त्रिपाठी यांची मुलगी आहे. खरं तर तिला अभिनेत्री बनण्यात काहीही रस नव्हता. कारण तिला रंगमंच आवडायचा. 8 / 10पण नशीबाने तिला बॉलिवूडमध्ये आणलं. तिला बॉलिवूड चित्रपटात संधी दिली. ‘मसान’नंतर श्वेता ‘हरामखोर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर केली होती.9 / 10श्वेता विवाहित आहे. चैतन्य शर्मासोबत 29 जून 2018 रोजी ती लग्नबेडीत अडकली. तिचा पती चैतन्य हा रॅपर आहे.10 / 10चैतन्य हा ‘स्लो चीता’ नावाने ओळखला जातो. श्वेतापेक्षा तो पाच वर्षांनी लहान आहे. मुंबईत अॅक्टिंग वर्ल्डमध्ये श्वेता व चैतन्य पहिल्यांदा भेटले आणि पुढे भेटींचा हा ‘सिलसिला’ सुरू राहिला. पुढे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग दोघांनी लग्न केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications