Join us

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 1:16 PM

1 / 14
अफगानिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलवर तालिबानने (Taliban) रातोरात कब्जा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना वाचविण्यासाठी देश सोडल्याचा दावा राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे अफगानिस्तानच्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील गेल्या 20 वर्षांपासून आलेले रंग बेरंगी झाले आहेत.
2 / 14
लोक आपल्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवू लागले आहेत. तेथील महिलांनी देखील ट्रंक पेट्यांमध्ये पडलेले बुरखे बाहेर काढले आहेत. अनेकींना सेक्स स्लेव बनण्याची भीती वाटू लागली आहे.
3 / 14
अफगानिस्तानात एक काळ असा होता, महिलांच्या कपड्यांवर आणि फॅशनवर एवढा पहारा नव्हता. Vida Samadzai ही अशाच अफगानिस्तानचा हिस्सा होती. तिने बिकीनी घालून अफगानिस्तानात गोंधळ उडवून दिला होता. (Do you know Afghan-American model Vida Samadzai who wore a bikini in Miss Earth pageant)
4 / 14
विदा समदझाई (Vida Samadzai) ही मूळची अफगानिस्तानची मॉडेल-अभिनेत्री आहे. तिचा जन्म 22 फेब्रुवारी 1978 मध्ये काबुलमध्ये झाला होता. तेव्हा अफगानिस्तानात फॅशन सामान्य होती.
5 / 14
यानंतर 90-95 मध्ये अफगानिस्तानात महिलांवर बंधने आली. तोवर विदासारख्या अनेक तरुणी फॅशनच्या दुनियेकडे आकर्षित झाल्या होत्या. विदाने यामध्येच आपले करियर केले आहे.
6 / 14
2003 मध्ये मिस अफगानिस्तान बनल्यानंतर Vida Samadzai आंतरराष्ट्रीय ब्यूटी (Miss Earth 2003 Edition)मध्ये चमकली होती. यावेळी तिने रेड कार्पेटवर बिकिनीमध्ये रँप वॉक केला होता. यामुळे अफगानिस्तानमध्य गोंधळ उडाला होता. अनेक लोक तिच्यावर भडकले होते.
7 / 14
एवढेच नाही तर अफगानिस्तानच्या सर्वोच्य न्यायालयाने देखील विदाच्या बिकिनी घालण्यावरून सुनावले होते. अशाप्रकारे अंग प्रदर्शन करणे इस्लामी कायदा आणि अफगान परंपरेच्या विरोधात आहे. या स्पर्धेत तिला 'ब्यूटी फॉर द कॉज' या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
8 / 14
1996 मध्येच विदा अमेरिकेला गेली होती. तिने कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठातून शिक्षण घेतले. यानंतर तिला अमेरिकेचे नागरिकत्व देखील मिळाले. तिथे तिने अफगान महिलांचे अधिकार आणि शिक्षणासाठी फंड जमविण्यास सुरुवात केली होती.
9 / 14
Vida Samadzai तालिबानची राजवट देखील पाहिली होती. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत तिने अफगानी महिला प्रतिभावान, समजुतदार आणि सुंदर असतात, असे सांगितले होते. तालिबान राजवट संपल्यावर तिने आनंद व्यक्त केला होता.
10 / 14
आता महिला शाळेत जाऊ शकतील. कामावर जाऊ शकतील, आता त्या स्वतंत्र झाल्या आहेत. आता त्यांना बुरखा घालण्यासाठी जबरदस्ती होणार नाही, असा आनंद व्यक्त केला होता.
11 / 14
Vida Samadzai ने 2005 मध्ये मिस अमेरिका स्पर्धाही जिंकली होती. एवढेच नाही तर ती बिग बॉसमध्ये पाचव्या सीझनमध्ये होती. 2011 मध्ये तिने भाग घेतला होता. 49 व्या दिवशी ती बाहेर पडली होती.
12 / 14
Vida Samadzai ने शोमध्ये अभिनेता अमर उपाध्यायसोबत चांगले बाँडिंग दाखविले होते. तिच्या पाठीवर मसाज करताना अमर दिसला होता. यानंतर त्यांच्या मधूर संबंधांची वृत्तेही गाजली होती.
13 / 14
आता अफगानिस्तानात पुन्हा तालिबान राज परत आले आहे. यावर विदाने सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केले आहे. तिने एक पेपर कटिंग पोस्ट केले आहे.
14 / 14
यामध्ये म्हटले आहे की, 'मेरी आंखों में अब आंसू नहीं बचे हैं- ताल‍िबान के टेकओवर के बाद अफगान के एजुकेशन एक्ट‍िव‍िस्ट' याद्वारे तिने तिची व्यथा मांडली आहे.
टॅग्स :अफगाणिस्तानतालिबानबिग बॉस