Join us

PHOTOS : ‘शोले’मधील सांभाची मुलगी पाहिली का? अभिनेत्रींना लाजवेल इतकी दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 5:46 PM

1 / 10
अरे ओ सांभा, कितने आदमी थे? हा ‘शोले’तील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. हा डायलॉग म्हणायला अमजद खान यांना तब्बल 40 रिटेक घ्यावे लागल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे, सांभा आणि त्यांची लेक विनती.
2 / 10
अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांचे निधन मे 2010 मध्ये झाले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्यांचे कुटुंबिय मुंबईत राहातं.
3 / 10
तूर्तास ‘शोले’त सांभाची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांची लहान मुलगी विनतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
4 / 10
मोहन यांना दोन मुली आहेत. मंजरी आणि विनती अशी त्यांची नावे. आता मंजरी व विनती या दोघीही बॉलिवूड कार्यरत आहेत.
5 / 10
लेखिका आणि दिग्दर्शिका अशी ओळख असलेल्या मंजरी माकिजानी ही मोहन यांची मोठी मुलगी आहे. यापूर्वी दिग्गज दिग्दर्शकांसोबत तिने काम केले आहे. तर विनती ही मॅक मोहन यांची लहान मुलगी अभिनेत्री, निर्माती आणि स्क्रिन रायटर आहे.
6 / 10
विनती प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर आहे. शिवाय सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
7 / 10
पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर, विनतीचे अभिनेत्री रवीनासोबत खास नातं आहे. होय, मॅक मोहन रवीनाचे सख्खे मामा होते. म्हणजेच विनती ही रवीना मामेबहिण आहे.
8 / 10
10 मे 2010 रोजी मॅक मोहन यांनी जगाचा निरोप घेतला होता. मॅक मोहन यांनी अनेक सिनेमांत काम केले. पण त्यांना ‘शोले’ने नवी ओळख दिली. आजही सगळेच त्यांना सांबा या नावाने ओळखतात.
9 / 10
‘शोले’तील त्यांच्या तोंडचा ‘पूरे पचास हजार’ हा उणापुरा तीन शब्दांचा संवाद लोकांना असा काही भावला की, सांबा हे पात्र अमर झाले.
10 / 10
1964 साली मॅक मोहन यांनी हकीकतमधून हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते. 46 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 175 सिनेमात काम केले होते.
टॅग्स :मॅक मोहन