Mrunal Thakur : "मी स्वत:ला सिद्ध करून करून थकले"; अभिनेत्री मृणाल ठाकूरने व्यक्त केली 'ही' खंत By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 3:37 PM1 / 12अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या 'हाय नन्ना' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट दमदार कलेक्शनसह हिट ठरला. 2 / 12जानेवारीच्या सुरुवातीला OTT वर रिलीज झाल्यानंतर, मृणालचा तेलुगू स्टार नानीसोबतचा रोमँटिक ड्रामा लोकांना खूप जास्त आवडला आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन 'हाय पापा'चीही चांगलीच चर्चा होत आहे.3 / 12याआधी मृणालच्या 'सीता रामम' या चित्रपटातील प्रेमकथाही प्रेक्षकांना आवडली होती. साऊथमध्ये दोन उत्कृष्ट प्रेमकथा केल्यानंतरही मृणालला हिंदीत रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नाहीत. त्यामुळे मृणाल थोडी नाराज झालेली पाहायला मिळत आहे.4 / 12'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले. पण असं असूनही तिला हिंदीत रोमँटिक चित्रपट मिळत नाहीत. मृणालने पिंकव्हिलाशी केलेल्या संभाषणात याबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं आहे. 5 / 12'मला माहित नाही, कदाचित मी लव्हस्टोरी मिळण्याइतकी लोकप्रिय नाही. काही चुकीचं बोलतेय का? लव्हस्टोरी असलेला चित्रपट मिळवण्यासाठी मला लोकप्रिय व्हायलाच हवं ना?, मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर आहेत, पण रोमँटिक कथा नाहीत.' 6 / 12'मला असे चित्रपट करण्यात खूप मजा येते. मला माहीत नाही यार, मी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून करून थकले आहे. मला वाटतं आता हे आपोआप व्हावं, मी स्वत:हून विचारणं बंद केलं आहे' असं मृणालने म्हटलं आहे. 7 / 12अभिनेत्री म्हणते की, ती रोमँटिक चित्रपट बघत मोठी झाली आहे. लोक म्हणतात रोमान्स आवडत नाही पण ते गुपचूप पाहतात. 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हटल्या जाणाऱ्या मृणालचे असंख्य चाहते आहेत. 8 / 12मी खूश आहे कारण 'हाय नन्ना' आणि 'सीता रामम' हे लोकप्रिय झाले. कदाचित इतर भाषांमध्येही ही जादू अशीच सुरू ठेवेन अशी मला आशा आहे. मला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हटल्यावर मी खूप भावूक झाले कारण शाहरुख खानला 'किंग ऑफ रोमान्स' म्हटलं जाते असंही मृणालने सांगितलं. 9 / 12मृणालने 2018 मध्ये 'लव्ह सोनिया' चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पदार्पण केलं. मनोज वाजपेयीसोबतच्या तिच्या चित्रपटाचं खूप कौतुक झालं आणि अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कारही मिळाले. 10 / 12हिंदीमध्ये तिने 'बाटला हाउस', 'तुफान' आणि 'जर्सी' सारखे चित्रपट केले, जे बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाहीत. आता लवकरच मृणाल विजय देवरकोंडासोबत 'फॅमिली स्टार'मध्ये दिसणार आहे. हिंदीमध्ये ती दिग्दर्शक नवज्योत गुलाटी यांच्या 'पूजा मेरी जान' या चित्रपटात काम करत आहे.11 / 1212 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications