Join us

१८ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते ही मराठी अभिनेत्री, पेट्रोल पंपावर करायची काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 9:41 AM

1 / 8
बॉलिवूडच्या सुपरहिट 'फॅशन' सिनेमातून प्रियंका चोप्रासोबत आणखी दोन अभिनेत्री झळकल्या. त्यातील एक कंगना रणौतने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. तर दुसरी अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) सुद्धा फॅशन सिनेमामुळे प्रकाशझोतात आली.
2 / 8
मुग्धा गोडसे आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने आणि टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत नाव कमावले. पण तिचं खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. तिच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले.
3 / 8
सुरुवातीच्या काळाच मुग्धा पेट्रोल पंपवर काम करत होती. तिला दिवसाला १०० रुपये मिळायचे. नंतर ती मॉडेलिंगकडे वळली आणि हळूहळू अभिनयात आली. 2004 च्या फेमिना मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये ती सेमी फायनलिस्ट होती. तर 2008 साली तिने मधुर भांडारकरच्या 'फॅशन' सिनेमातून डेब्यू केले.
4 / 8
मुग्धाचा जन्म पु्ण्यातील एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिथेच तिने शिक्षण घेतलं. मुग्धाचा सुरुवातीचा काळ खूपच स्ट्रगलपूर्ण होता. ती तेल विकायची तर पेट्रोल पंपवरही कामाला होती.
5 / 8
हळूहळू तिने मॉडेलिंग आणि नंतर अभिनयात पदार्पण केलं. यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली. मुग्धाने आतापर्यंत 'ऑल द बेस्ट','गली गली मे चोर है','जेल' आणि 'विल यू मॅरी मी' या सिनेमांमध्येही काम केलं.
6 / 8
मुग्धाचं वैयक्तिक आयुष्य तेव्हा चर्चेत आलं जेव्हा ती राहुल देवसोबत रिलेशनशिपमध्ये आली. राहुल देव (Rahul Dev) बॉलिवूड अभिनेता असून तो मुग्धाहून १८ वर्षांनी मोठा आहे. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली.
7 / 8
राहुल देवच्या पहिल्या पत्नीचं २००९ साली कॅन्सरने निधन झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. सिद्धार्थ असं त्याचं नाव आहे. मुग्धाला भेटल्यानंतर राहुल परत प्रेमात पडला. 2015 साली दोघांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
8 / 8
मुग्धा आणि राहुल देव दोघंही ९ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतात. मात्र त्यांचा लग्न करण्याचा विचार नाही. जर एकमेकांवर प्रेम असेल तर वयामुळे काहीच फरक पडत नाही असं मुग्धा म्हणाली होती.
टॅग्स :मुग्धा गोडसेराहुल देवरिलेशनशिपबॉलिवूडफॅशन