By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:23 IST
1 / 7'बजरंगी भाईजान' सिनेमात सलमान खानसोबत दिसणारी छोटी मुन्नी आठवत असेलच. हर्षाली मल्होत्रा असं तिचं नाव असून तिने लिफ्टमध्ये अनोखं फोटोशूट केलंय2 / 7हर्षाली मल्होत्राने लिफ्टमध्ये फोटोशूट करुन तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना दाखवल्या आहेत. हर्षालीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी पसंती दिली आहे.3 / 7'ही मुन्नीच आहे का?', 'छोटी मुलगी आता मोठी झाली?', 'मुन्नीला आता ओळखता येत नाहीये', अशा कमेंट्स करत लोकांनी हर्षालीच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे4 / 7लहान वयात चमकलेल्या हर्षालीने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवले. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली.5 / 7हर्षाली मल्होत्रा आता १५ वर्षांची असून ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि रील्सच्या माध्यमातून सक्रीय असते.6 / 7'इमर्जन्सी' असेल तर कृपया असं करु नका, असं खास कॅप्शन हर्षालीने या फोटोला दिलंय. हर्षाली सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय7 / 7काहीच दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये हर्षाली दिसली होती. त्यावेळी तिने 'बजरंगी भाईजान'मध्ये तिच्यासोबत काम केलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीची खास भेट घेतली. तेव्हा हर्षालीचं बदललेलं रुप बघून नवाझुद्दीनने सुद्धा तिला ओळखलं नाही.