माझा कष्टाळू लेक... तैमुरच्या बर्थ डे दिनी करिनाची भावूक पोस्ट By महेश गलांडे | Published: December 20, 2020 12:20 PM1 / 11बॉलिूवडमधील नवाब आणि बेबो यांचा मुलगा तैमुर अली खान हा 4 वर्षांचा झाला आहे. तैमुरचा आज चौथा वाढदिवस साजरा होत आहे. 2 / 11बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर स्टार किड्स म्हणून तैमुरची नेहमीच चर्चा असते, तैमुरच्या नामकरणापासून तैमुर हा चर्चेचा विषय ठरला आहे. 3 / 11करीना कपूर सध्या गरोदर असल्याने काही दिवसांतच त्यांच्या घरी आणखी एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे, त्यामुळे लवकरच तैमुर बडे भाईजान बनणार आहे. 4 / 11कोरोना व्हायरसमधील लॉकडाऊन काळात तैमुरने अनेक क्रिएटीव्ह कामे केल्याचं आपण सोशल मीडियावरुन पाहिलंय, करिना कपूरने आपल्या लाडक्या लेकाचे फोटो सोशल मीडियातून अनेकदा शेअर केले आहेत5 / 11करिनाने आजही तैमुरचा खास फोटो व्हिडिओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, या व्हिडिओत तैमुरला गाईला चारा खाऊ घालताना दिसत आहे. 6 / 11करिनाने तैमुरचं वर्णन करताना, माझा कष्टाळू लेक.. असं म्हटलंय. तसेच, तुला हवं असलेल्या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तू दृढसंकल्प, समर्पण आणि ध्यान देत असल्याचा मला आनंद आहे7 / 11जेव्हा तू चारा उचलून गाईसाठी घेऊन जातो, गॉड ब्लेस यू माझ्या कष्टाळू पोरा... असे म्हणत गेल्या 4 वर्षातील तैमुरचे करिनाने कौतुक केले आहे. 8 / 11हे सर्वकाही करत असताना, तू बर्फाची चव चाखायला विसरू नको, फुलांसोबत दरवळायला, उंच आणि खाली उड्या मारायला, झाडांवर चढायला आणि केक खायला तू विसरू नकोस, असेही करिनाने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलंय. 9 / 11तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर, नेहमीच ताठ मानेनं जगायला शिक, जे केल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, ते सर्व करत राहा. तुझ्यावर तुझ्या अम्मापेक्षा कुणीही जास्त प्रेम करु शकत नाही, असेही करिनाने म्हटलं आहे. 10 / 11करिनाने इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट आल्या असून तैमुरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 11 / 11तैमुरला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आणखी वाचा Subscribe to Notifications