नच बलिये 10 या कार्यक्रमात सहभागी होणार हे सेलिब्रेटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:19 IST
1 / 6दृष्टी धामीने झलक दिखला जा या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात तिचे नृत्य कौशल्य सगळ्यांना पाहायला मिळाले होते. ती नच बलियेमध्ये पती नीरज खेमका सोबत भाग घेणार असल्याची चर्चा आहे. 2 / 6क्रिकेटर श्रीसंतने त्याचा डान्सिंग जलवा झलक दिखला जा या कार्यक्रमात दाखवला होता. आता तो पत्नी भवनेश्वरीसोबत नच बलियेमध्ये थिरकणार असल्याची चर्चा रंगली आहे. 3 / 6एफआरआय या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली कविता कौशिक पती रोनित बिस्वाससोबत नच बलियेमध्ये हजेरी लावणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.4 / 6रुबिना दिलाइक आणि अभिनव शुक्ला यांचे लग्न नुकतेच झाले असून ते दोघे नच बलियेमध्ये भाग घेणार असल्याची चर्चा आहे. रुबिना दिलाइकने छोटी बहू-सिंदूर बिन सुहागन, सास बिना ससुराल, पुनर्विवाह, शक्ती-अस्तित्व के एहसास की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 5 / 6प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची ओळख बिग बॉस या कार्यक्रमात झाली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. प्रिन्सने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तो नच बलिये या कार्यक्रमात आता युविकासोबत दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 6 / 6ये हे मोहोब्बते फेम अनिता हंसनंदानीचे रोहित रेड्डीसोबत 2013 मध्ये लग्न झाले होते. त्या दोघांचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग आहे. नच बलिये या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये ते झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.