'नदिया के पार'फेम गुंजाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ग्लॅमरसतेमुळे ओळखणंही झालंय कठीण By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 8:00 AM1 / 8१९८२ साली प्रदर्शित झालेला नदिया के पार हा चित्रपट आज अनेकांच्या लक्षात असेल. अभिनेता सचिन पिळगांवकर आणि साधना सिंह यांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होती. (फोटो सौजन्य: साधना सिंह इन्स्टाग्राम पेज)2 / 8या चित्रपटात सचिन पिळगांवकरने चंदन ही भूमिका साकारली होती. तर, साधनाने गुंजा. या दोन्ही कलाकारांच्या भूमिका त्यावेळी विशेष गाजल्या होत्या.3 / 8हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरीच वर्ष झाली आहेत. या उलटून गेलेल्या वर्षांमध्ये गुंजामध्ये म्हणजेच अभिनेत्री साधना सिंहमध्ये कमालीचा बदल झाला आहे.4 / 8सध्याच्या घडीला साधनाला पाहिल्यानंतर तिच गुंजा असण्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.5 / 8साधना सध्या छोट्या पडद्यावर झळकत असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.6 / 8सोशल मीडियावर सध्या साधनाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिच्यात झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो.7 / 8साधना या वयातही सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळतं. तसंच ती नवनवीन स्टाइलदेखील उत्तमरित्या कॅरी करते.8 / 8साधना यांचा मालिकेतील एक फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications