घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 6:07 PM1 / 10तेलुगू अभिनेता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी आज (८ ऑगस्ट रोजी) रोजी साखरपुडा केला आहे. पण, यातच नागा चैतन्य आणि त्याची पुर्व पत्नी समांथाच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. 2 / 10नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथसोबत लग्न केले होते, पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. लग्नाला चार वर्षे झालेली असताना दोघे वेगळे झाले. 3 / 10 घटस्फोट म्हटल्यावर कायद्यानुसार सर्वच गोष्टी आल्याच. पोटगी हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. असं म्हटलं जात की समंथाला नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून थोडीथोडकी नसून तब्बल 200 कोटी रुपये रक्कम पोटगी म्हणून देऊ केली होती. पण, यात किती तथ्य आहे ते आपण जाणून घेऊया. 4 / 10समंथा नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला, तेव्हा अनेक बातम्या हेडलाईनमध्ये होत्या. दोघांमधील भांडणाचे एक कारण म्हणजे समंथाने चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारणे. नागा हा तिच्या बोल्ड भूमिकेविरोधात होता. तर काहींनी तिच्या चारित्र्यावर टीका केली होती. या सर्व अफवांवर सामंथाने एक लांबलचक नोट लिहून लोकांना गप्प केले होते.5 / 10समंथाने लिहलं होतं, 'माझ्या खासगी जीवनात आलेल्या या वादळामध्ये तुमच्या भावनिक सहभागाने मला आधार दिला आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. ज्यामुळे मी अफवा आणि वाईट भावनांविरोधात उभी राहू शकले. ते म्हणतात की माझी काही प्रेम प्रकरणे होती, मला बाळ नको हवे होते, मी संधी साधू आहे आणि आता तर असेही म्हटले जात आहे की अनेकदा माझा गर्भपातदेखील झाला आहे'.6 / 10पुढे तिनं लिहलं होतं, 'घटस्फोट ही अतिशय वेदनादायी प्रोसेस आहे. मला एकटीला यातून सावरण्यासाठी वेळ हवा आहे. माझ्या चारित्र्यावर असा हल्ला करणे चुकीचे आहे. परंतु, मी वचन देते की यापैकी कोणत्याही गोष्टीला आणि कोणालाही मी माझे आत्मबळ तोडू देणार नाही'. दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट का झाला हे उघड झाले नाही. 7 / 10एवढेच नाही तर पोटगीच्या मुद्द्यावर समंथा रुथनेही सडेतोड उत्तर दिले होते. समंथा ही 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली होती, 'जेव्हा जेव्हा मी २०० कोटींच्या पोटगीचा विचार करते, तेव्हा मला वाटते की जेव्हा आयकर लोक येतील, तेव्हा त्यांना दिसेल की माझ्याकडे काहीच नाही'.8 / 10सियासतच्या रिपोर्टनुसार, नागा चैतन्यची एकूण संपत्ती 154 कोटी रुपये आहे. तो दक्षिणेतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. तर समंथा ही 100-101 कोटी रुपयांची मालक आहे.9 / 10समंथाने तिच्या अभिनय कौशल्यावर आणि जिद्दीने टॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. समंथा एक उत्तम अभिनेत्री असून तिने शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. 10 / 10नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा तिच्या लग्नाच्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या लग्नातील साडी सुद्धा नागा चैतन्यला परत केली होती. त्यानंतर आता तिने तिच्या लग्नातील वेडिंग गाऊन सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला. जुन्या आठवणींमध्ये अडकून रहायला नको यासाठी तिने तिच्या वेडिंग गाऊनपासून एक नवा डिझायनर ड्रेस तयार केला. आणखी वाचा Subscribe to Notifications