Join us

Marathi Actors : तुमच्या या आवडत्या मराठी कलाकारांची पहिली कमाई किती होती माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 2:21 PM

1 / 10
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवतात. पण त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही. सुरुवातीच्या काळात त्यांचीही कमाई तुटपुंजी होती. तर जाणून घेऊया आवडत्या मराठी कलाकारांची पहिली कमाई...
2 / 10
बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा संघर्ष सगळ्यांनाच ठाऊक आहे. नाना पाटेकरांनी नववीत शिकत असताना ३५ रुपये महिना अशी नोकरी केली होती. यासाठी ते माटुंगा ते चुनाभट्टी हे नऊ किलोमीटरचे अंतर चालत पार करायचे.
3 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता म्हणून सुबोध भावेकडे पाहिलं जातं. सुबोधचं पहिलं मानधन ऐकलं तर अनेकांना धक्का बसेल. सुबोधने त्याच्या करिअरची सुरुवात वीर सावरकर या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटासाठी त्याला केवळ १०० रुपये मानधन मिळालं होतं.
4 / 10
आता लाखोने कमावणारा, अलिशान आयुष्य जगणारा मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीची पहिली कमाई ८० रुपये होती. एका नाटकाच्या मानधनाच्या रुपात त्याला हे पैसे मिळाले होते.
5 / 10
चला हवा येऊ द्या या मालिकेत विदर्भाचा तडका देणारे अभिनेते भारत गणेशपुरे यांची पहिली कमाई ५०० रुपये होती. अमरावतीहून मुंबईत आल्यानंतर एका दिग्दर्शकाकडे तीन महिने काम केल्यानंतर ५०० रुपये मिळाले होते.
6 / 10
मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मुक्ताने सुयोग संस्थेच्या आम्हाला वेगळं व्हायचं आहे, या नाटकात काम केलं होतं आणि त्यापोटी तिला केवळ १५० रूपये मिळाले होते.
7 / 10
‘महाराष्ट्राची लोकधारा’सारखाच एक कार्यक्रम पुण्यात होत असे. त्यात टीमसोबत प्रसाद कोरसमध्ये गायचा. त्यासाठी त्याला त्यावेळी २५ रुपये मिळाले होते.
8 / 10
सगळ्यांचे लाडक भाऊजी अर्थात आदेश बांदेकर केवळ १५ वर्षांचे असताना त्यांनी एका मिरवणुकीत ढोल वाजवला होता. यासाठी त्यांना १५ रूपये मिळाले होते.
9 / 10
अंकुश चौधरी हा सर्वांचा लाडका अभिनेता. त्याची पहिली कमाई किती होती माहितेय, तर फक्त १५ रूपये. होय, १९९१ मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या नाटकात काम करण्यासाठी अंकुशला १५ रुपये मिळायचे.
10 / 10
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सर्वांची लाडकी गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू. टाईम प्लीज या सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला केवळ ३०० रूपये मानधन मिळालं होतं.
टॅग्स :मराठी अभिनेतानाना पाटेकरस्वप्निल जोशीमुक्ता बर्वेसुबोध भावे