माझी थांगमे...! लग्नाच्या काही तास आधी विग्नेशने नयनतारासाठी लिहिली खास पोस्ट, पाहा रोमॅन्टिक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:32 PM 2022-06-09T13:32:52+5:30 2022-06-09T13:41:39+5:30
Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा व दिग्दर्शक विग्नेश शिवन आज लग्नबंधनात अडकले. गेल्या 7 वर्षांपासून हे कपल एकमेकांच्या प्रेमात होतं. दोघांनीही आपलं प्रेम कधीच जगपासून लपवलं नाही. म्हणूनच दोघांचे रोमॅन्टिक फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा व दिग्दर्शक विग्नेश शिवन आज लग्नबंधनात अडकले. गेल्या 7 वर्षांपासून हे कपल एकमेकांच्या प्रेमात होतं. दोघांनीही आपलं प्रेम कधीच जगपासून लपवलं नाही. म्हणूनच दोघांचे रोमॅन्टिक फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे फोटो पाहून दोघांचं एकमेकांवरचं किती प्रेम आहे, हे दिसतं.
नयनतारा आयुष्यात आली, याबद्दल विग्नेश स्वत:ला नशिबवान मानतो. लग्नाच्या काही तास आधी विग्नेशने आपल्या लेडी लव्हसाठी एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे.
‘आज 9 जून... हा मला व नयनला परमेश्वाने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणूनच आज आम्ही इथे आहोत. हे सगळं माझ्या आयुष्यातील प्रेमाला समर्पित आहे! नयनतारा... माझी थांगमे... काहीच तासांत तुला वधुच्या रूपात बघेन. तुला बघण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे प्रेमळ कुटुंब आणि प्रेमळ मित्रांच्या साक्षीने आयुष्याची नवी सुरूवात करताना मी प्रचंड उत्सुक आहे,’ असं त्याने लिहिलं आहे.
आज महाबलीपुरम येथे विग्नेश व नयनतारा लग्नगाठ बांधत आहेत. या लग्नाला साऊथचे बडे स्टार पोहोचले आहेत. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान हाही लग्नाला हजर आहे.
थोड्या वेळात विग्नेश लग्नाचा पहिला फोटो शेअर करणार आहे. पण त्याआधी या कपलच्या प्रेमाची साक्ष देणारे हे काही रोमॅन्टिक फोटो तुम्ही बघायलाच हवेत.
एका शोमध्ये नयनताराने पहिल्यांदा विग्नेशसोबतच्या नात्याची कबुली दिली. साखरपुडा झाल्याचा खुलासाही तिने केला होता. गतवर्षी विग्नेश व नयनतारा यांनी साखरपुडा केला होता.
नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
विग्नेशच्या आधी नयनतारा प्रभुदेवाच्या प्रेमात अशीच आकंठ बुडाली होती. अॅक्टर प्रभुदेवासोबत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते.
एकेकाळी नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या अफेअरची टॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा होती. प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता.
2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहात असल्याचा आरोप तिने केला होता.
प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केलं तर ती आमरण उपोषण करेल, अशी धमकीही तिने दिली होती. नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवानं त्याचे 16 वर्षाचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला होता.
जुलै 2011 मध्ये प्रभुदेवानं त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. पण पुढच्याच वर्षी म्हणते 2012 मध्ये प्रभुदेवासोबतचे माझे सर्व संबंध संपल्याचे नयनताराने जाहिर केलं होतं. तिने त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते.