जयपूरच्या राणीने घडवून आणली होती नीना गुप्ता-विव रिचर्ड्स यांची भेट, नंतर अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:39 AM1 / 10सर विव रिचर्ड्स त्यांच्या काळातील दिग्गज क्रिकेटर आहेत. वेस्टइंडिजच्या या खेळाडूचं बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्तासोबत अफेअर होतं. दोघांनी लग्न केलं नाही, पण त्यांना एक मुलगी आहे. तिच मुलगी मसाबाच्या लग्नासाठी विव रिचर्ड्स भारतात आलेले आहेत. विवाहित असूनही विव रिचर्ड्स यांचं अफेअर नीना गुप्तासोबत होतं. पण नंतर 2008 मध्ये नीना गुप्ता यांनी एका सीएसोबत लग्न केलं.2 / 10मसाबा ही विव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची लग्न न करता झालेली मुलगी आहे. नुकतंच तिने लग्न केलं. तेव्हा नीना आणि विव हे सोबत दिसले. नीना गुप्ता यांनी एकटीनेच मुलीचं संगोपन केलं. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी विव रिचर्ड्स यांना बोलवलं होतं.3 / 10अनेकांना प्रश्न पडतो की, विव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली होती. कसे दोन वेगळ्या क्षेत्रातील लोक एक झाले होते? चला तर मग जाणून घेऊ या दोन दिग्गजांची लव्हस्टोरी...4 / 1080 च्या दशकात दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. नीना गुप्ता यांना क्रिकेटची आवड होती. विव रिचर्ड्स कॅप्टन असलेली वेस्टइंडिजची टीम भारत दौऱ्यावर आली होती. हा तो काळ होता जेव्हा वेस्टइंडिज टीम जगात सगळ्यात खतरनाक टीम मानली जात होती. नागपूरला झालेल्या वन-डे सामन्यावेळी नीना गुप्ता उपस्थित होती.5 / 10भारत ही मॅच हरला होता. वेस्टइंडिज टीम 2 रनने ही मॅच जिंकली होती. पण तरीही विव रिचर्ड्स फार विचारात होते. आपली ऑटो बायोग्राफी ‘सच कहूं तो’ मध्ये नीना गुप्ता यांनी सांगितलं की, पूर्ण वेस्टइंडिज टीम एन्जॉय करत होती. पण विव रिचर्ड्सच्या गंभीर हावभावाने ती इम्प्रेस झाली होती. त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून असं वाटलं होतं की, ते मॅचबाबत फार गंभीर होते.6 / 10या मॅचच्या एक दिवसानंतर जयपूरच्या राणीने एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यात वेस्टइंडिज टीमला बोलवण्यात आलं होतं. नीना गुप्ताच्या बंटवारा सिनेमाचं शूटींगही राजस्थानमध्येच सुरू होतं. राजेश खन्ना आणि सिनेमातील इतर कलाकारांनाही या पार्टीमध्ये बोलवण्यात आलं होतं. इथे नीनाची रिचर्ड्स यांच्यासोबत भेट झाली. तिने त्यावेळी त्यांच्या स्टाईलचं कौतुक केलं होतं. सोबतच असंही म्हणाली होती की, भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर नक्की भेटू.7 / 10सीरीज संपल्यानंतर रिचर्ड्स आपल्या देशात परत गेले. नीना सुद्धा आपल्या कामात बिझी झाली. दोघांनी एकमेकांचे नंबरही घेतले नव्हते. नीना यांनी सांगितलं की, त्यांना अंदाज नव्हता की, भविष्यात विव यांच्यासोबत कधी भेट होईल किंवा नाही. पण नशीबाला काही वेगळंच मान्य होतं.8 / 10 त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की, या भेटीनंतर ती विव यांना पूर्णपणे विसरली होती. नंतर काही वर्षांनी एक दिवस दिल्लीच्या विमानतळावर नीना यांना वेस्टइंडिज टीम दिसली. नीना विव यांना भेटण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. दोघांची भेट झाली आणि इथून त्यांची कहाणी सुरू झाली. दोघांच्या रोमान्सच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.9 / 10विव रिचर्ड्स हे आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. पण त्यांचं वैवाहिक जीवन ठिक सुरू नव्हतं. अशात ते नीना गुप्ता यांना सोबत घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यांनी नीनाला त्यांची मजबूरी सांगितली. सीरीज संपली आणि विव पुन्हा आपल्या देशात परत गेले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. नीना प्रेग्नेंट होती.10 / 10नीना यांनी सांगितलं की, तिला हे बाळ नको होतं. तिने रिचर्ड्स यांना याबाबत सांगितलंही होतं. पण विव रिचर्ड्स यांनी तिला बाळाला जन्म देण्याचा सल्ला दिला. नीनानेही ते मान्य केलं आणि मसाबाचा जन्म झाला. मसाबामुळेच नंतर अनेकदा दोघे सोबत आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications