'तुझ्याकडे 72 तास आहेत लग्न कर...'; लग्नापूर्वीच्या प्रेग्नंसीवर बऱ्याच वर्षांनी नेहाने सोडलं मौन By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:31 AM1 / 10स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. बऱ्याचदा नेहा तिच्या थेट बोलण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत येत असते. सध्या अशाच एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे.2 / 10बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागलं होतं.3 / 10नेहाची प्रेग्नंसी त्याकाळात खूप गाजली होती. परंतु, नेहाने त्यावेळी कोणत्याही ट्रोलर्सला उत्तर दिलं नव्हतं. परंतु, बराच काळानंतर ती याविषय़ी व्यक्त झाली आहे.4 / 10 आपण सगळेच जण कॅन्सल कल्चरचे पीडित आहोत. त्यामुळे बहुतांश वेळा आपण सोशल मीडियाचा गैरवापर करतो. यात सगळ्यात जास्त वेळा तुम्ही इतरांना कमी लेखण्यात वेळ घालवता. आम्ही सेलिब्रिटी किंवा पब्लिक फिगर आहोत याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला काहीही बोलाल, असं नेहा म्हणाली.5 / 10पुढे ती म्हणते, लग्नाअगोदर प्रेग्नंट झालेल्या महिलांविषयी एखादं आर्टिकल असेल तर आजही त्यात मला टॅग केलं जातं. कारण कोणीतरी तुमच्या जीवनाबद्दल विचित्र गणित तयार करत बसले असतात. जे खरंच अर्थहीन आहे. लोक कशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करतात आणि तुमच्यावर नजर ठेवून असतात. या सगळ्यात खरंच काही अर्थ नाहीये.6 / 10दरम्यान, नेहाने १० मे २०१८ मध्ये अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.7 / 10लग्नानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर लग्नाला पाच वर्ष झाल्यावर नेहाने एका मुलाखतीमध्ये तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं.8 / 10मी लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं माझ्या पालकांना कळलं त्यावेळी त्यांनी मला फक्त ७२ तासांची वेळ दिली होती. तुझ्याकडे लग्नासाठी फक्त ७२ तास आहेत असं ते म्हणाले. त्यानंतर मी लगेच मुंबई गाठली आणि अंगदसोबत लग्न केलं9 / 10नेहाने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. नेहाने ‘कयामत : सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. 10 / 10 नेहाने हिंदीसह पंजाबी, तेलगू, मल्याळम अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications