Net worth: साधी राहणी असलेले KK होते कोटयवधींचे मालक; लाइव्ह कॉन्सर्टसाठी घ्यायचे लाखोंचं मानधन By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 10:47 AM1 / 13प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे.2 / 13एका लाइव्ह कॉर्न्स्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे केके यांचं निधन झालं.3 / 13आजवरच्या कारकिर्दीमध्ये केके यांनी 2500 पेक्षा अधिक गाणी गायली होती. त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळी जादू होती. त्यामुळेच त्यांची गाणी ऐकल्यावर प्रत्येकाला जुने कॉलेजमधील वा मित्रांच्या कट्ट्यावरील दिवस आठवायचे.4 / 13हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगालीसह अन्य भाषांमध्ये गाणी गायत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं.5 / 13केके यांचं निधन धक्कादायक असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्ट चर्चिल्या जात आहेत.6 / 13सध्या सोशल मीडियावर केके यांची लव्हस्टोरी आणि त्यांची एकूण प्रॉपर्टी यांची चर्चा होताना दिसते.7 / 13९०च्या काळापासून कलाविश्व दणाणून सोडणाऱ्या केके यांनी त्यांच्या कलागुणांच्या जोरावर बऱ्यापैकी संपत्ती गोळा केली होती.8 / 13 चित्रपटातील गाण्यांना आवाज देण्यासोबतच ते लाइव्ह कॉन्सर्ट वा अन्य स्टेज शोदेखील करायचे. त्यामुळे हा एक त्यांच्या कमाईचा स्त्रोत होता.9 / 13मूळ दिल्लीतील असलेल्या केके एका गाण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये मानधन घ्यायचे.10 / 13 लाइव्ह कॉन्सर्ट असेल तर त्यासाठी ते १० ते १५ लाख रुपये फी घ्यायचे.11 / 13अत्यंत साधे राहणारे केके यांची एकूण संपत्ती १.५ मिलिअन डॉलर इतकी असल्याचं सांगण्यात येतं.12 / 13केके यांना लक्झरी कारची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडे एकाहून एक सरस कारचं कलेक्शन होतं.13 / 13केके यांच्या पश्चात त्यांची पत्नी जॉथी, दोन मुलं आहे. कुन्नथ नकुल आणि कुन्नथ तमारा ही त्यांची दोन मुलं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications