Join us

सुशांत सिंह राजपूत मृत्यूला नवं वळण; कुपर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:15 AM

1 / 10
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूला २ वर्ष उलटली तरी त्याच्या मृत्यूवरील संशय आजही कायम आहे. वांद्र्यातील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह आढळला. सुशांतने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. परंतु त्यानंतर या प्रकरणात रोज विविध अँगल समोर आले.
2 / 10
सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला होता. त्यात सुशांत राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिनेही सुशांतच्या मृत्यूपूर्वी आत्महत्या केली असल्याचं पुढे आले होते. त्यामुळे या दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला.
3 / 10
त्यात आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला पुन्हा नवं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सुशांतच्या मृतदेहावर ज्या कुपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमोर्टम करण्यात आले. त्याठिकाणच्या कर्मचाऱ्याने आता समोर येत मोठा दावा केला आहे.
4 / 10
कूपर हॉस्पिटलचे कर्मचारी रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. सुशांतचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी आणण्यात आला तेव्हा त्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हाताला मुक्का मार लागल्याच्या खूणा होत्या.
5 / 10
सुशांतच्या मृतदेहावर पोस्टमोर्टम करताना व्हिडिओ काढण्यात आले नाहीत. केवळ फोटो काढले. त्याच्या गळ्यावर खूणा दिसत होत्या. मृतदेहावर पोस्टमोर्टम करताना तो मर्डर असल्याचं जाणवत होतं. ते वरिष्ठांना सांगितले पण घाईगडबडीत सगळं करण्यात आले असं रुपकुमार शाह यांनी म्हटलं.
6 / 10
जेव्हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी घेतला जातो तेव्हा आत्महत्या केलेला मृतदेह आणि हत्या केलेला मृतदेह यात भरपूर फरक दिसून येतो. सुशांतच्या गळ्यावर ज्या खूणा होत्या हत्येसारख्याच दिसत होत्या. आत्महत्या सारखं नव्हतं. अंगावरचा मुका मार इतका होता की आत्महत्या करणाऱ्याच्या शरीरावर नसतात असं शाह यांनी म्हटलं.
7 / 10
१४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब सातत्याने सुशांतच्या आत्महत्येला हत्या सांगत होते. मात्र या प्रकरणाचं गूढ कायम राहिले. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
8 / 10
सुरूवातीला मुंबई पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण समजून तपास केला होता. तर सुशांतच्या कुटुंबाने काही दिवसांनंतर हत्या असल्याचे सांगत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला हत्येसाठी जबाबदार ठरविले होते आणि तपासाची मागणी केली होती.
9 / 10
सध्या संसद आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणं लोकसभेत उचलण्यात आले. त्यात AU नावाचा उल्लेख करण्यात आला. तर नागपूर हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण पुन्हा उचलून धरत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिशा मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
10 / 10
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्याच झाली असावी. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊच शकत नाही असा दावा रुपकुमार शाह यांनी केला आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात पुन्हा चौकशी होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूत