PICS : याचीही काय गरज होती? निया शर्माचे व्हाईट जॅकेटमधील फोटो पाहून संतापले युजर्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:17 PM1 / 10‘नागीन’ फेम निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे निया ट्रोलही होते. पण निया ट्रोलर्सची अजिबात पर्वा करत नाही.2 / 10आपल्या अदांनी रिझवणा-या नियाने नुकतेच काही फोटो शेअर केलेत आणि तशी पुन्हा ट्रोल झाली.3 / 10या फोटोत नियाने एक व्हाईट कलरचे जॅकेट कॅरी केले आहे. नियाच्या काही चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रशंसाही केली.4 / 10नियाचा हा लूक काही चाहत्यांना मात्र खटकला आणि त्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.5 / 10याचीही काय गरज होती. इतका शौक आहे दाखवण्याचा तर तेही काढून टाक, असे आक्षेपार्ह भाषेत काहींनी तिला ट्रोल केले.6 / 10निया सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पण तिच्या चाहत्यांचीही संख्या कमी नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.7 / 10निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. 8 / 10नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते.9 / 10‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. 10 / 102017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन;च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications