"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:14 PM1 / 10मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोखपणे बजावल्या. 2 / 10केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि भोजपुरी सिनेमांतही त्यांनी ठसा उमटवला आहे. अशोक सराफ यांनी जवळपास ५० हिंदी सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 3 / 10अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतून बहुरुपी कलाकाराचा सन्मान केल्याच्या भावना उमटत आहेत. 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 4 / 10अतिशय योग्य व्यक्तीला हा महाराष्ट्रातील उच्च पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री आणि अशोकच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभारी आहे. 5 / 10मी खूपच भारावून गेले आहे. अशोकचा जीव त्यांच्या कलेत आहे. त्यामुळे फॅन्सनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत कायम त्यांच्या कलाकृतींना उत्तम प्रतिसाद दिला आहे. 6 / 10या पुरस्कारात त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते या सर्वांचाच वाटा आहे. अशोकना पद्मभूषण मिळावा, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. 7 / 10पण, यंदा राजदत्त यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंताला पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याचा खूप खूप आनंद आहे. त्या पुरस्कारासाठी दत्ताजी योग्य होते. 8 / 10अशोक यांना चाहते अभिनयातील ‘सम्राट अशोक’ म्हणतात; पण मी त्यांना ‘श्रीमान योगी’ म्हणते. कारण सगळ्यात असूनही ते सगळ्यांपासून अलिप्त राहतात. त्यांची ही वृत्तीच त्यांना इथवर घेऊन आली आहे. 9 / 10नट म्हणून ते चतुरस्र अभिनेते आहेत. प्रेक्षकांना जरी त्यांची कॉमेडी आवडत असली तरी त्यांनी कायम विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 10 / 10महाराष्ट्राने या कलावंताला दिलेल्या या पुरस्काराच्या वर्णनासाठी आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications