Join us

No Entry फेम सेलिना जेटलीनं बॉलिवूडला केला रामराम, वैवाहिक आयुष्याचा घेतेय आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 11:01 IST

1 / 7
सध्या सर्वत्र नो एंट्री २ ची चर्चा आहे. पण तुम्ही २००५ मधील नो एंट्री चित्रपट आठवतोय ना. ज्यामध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, सेलिना जेटली, बिपाशा बसू आणि लारा दत्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
2 / 7
पण आता १९ वर्षात संपूर्ण कलाकारांचा लूकच बदलला आहे. त्यापैकी एक अभिनेत्री सेलिना जेटली आहे, जी १२ वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे आणि आता ती पत्नी आणि तीन मुलांची आई आहे. आता तिचा लूक पूर्णपणे बदलला असून ती आधीपेक्षा आता जास्त ग्लॅमरस दिसते.
3 / 7
वास्तविक, अभिनेत्रीने अलीकडेच चाहत्यांना तिच्या ट्रान्सफॉर्मेशन दाखवली, ज्यामध्ये तिने टेम्पलेट वापरला. पंजाबी भाषेत लिहिले होते. माफ करा यार, माझे ब्रेकडाउन झाले आहे. तिने शेअर केले की तिला तिच्या दुसऱ्या गरोदरपणात तिच्या जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यावर तिने योगच्या माध्यमातून मात केलीय आणि आता परिवर्तन घडवून आणले आहे.
4 / 7
व्हिडिओला कॅप्शन देताना अभिनेत्रीने लिहिले की, 'आयुष्यात चढ-उतार येतात.. त्यांना स्क्वॉट्समध्ये बदला. मला माहित आहे की हे कठीण आहे परंतु शरीर आणि कोणत्याही बाह्य परिस्थितीपेक्षा मन मजबूत आहे.. हार मानू नका.'
5 / 7
सेलिना जेटलीने नो एन्ट्री, गोलमाल रिटर्न्स आणि अपना सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ९ वर्षात १३ फ्लॉप चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने इंडस्ट्रीला अलविदा केला.
6 / 7
यानंतर, २०१२ मध्ये, अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियन उद्योगपती पीटर हेगशी लग्न केले आणि दोनदा जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र काही कारणास्तव एका मुलाचं निधन झालं.
7 / 7
आता सेलिना जेटली तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकित झाले आहेत.
टॅग्स :सेलिना जेटली