नोरा फतेहीला कराचंय तैमूरसोबत लग्न, मम्मी करिना कपूर म्हणाली.. By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 5:30 PM1 / 10बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Photo Instagram) 2 / 10नोरा अलीकडेच करिना कपूर हिच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली. (Photo Instagram) 3 / 10यावेळी करिनासमोरच नोराने ही इच्छा व्यक्त केली. (Photo Instagram) 4 / 10तैमूर तुझ्या डान्स मुव्हचा दिवाना आहे, असे करिनाने नोराला सांगितले. यावर नोराने थेट तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. (Photo Instagram) 5 / 10नोराचे हे शब्द ऐकून करिनाला हसू आवरले नाही. तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे, त्याच्या लग्नाला आता बराच वेळ आहे, असे ती हसत हसत म्हणाली. (Photo Instagram) 6 / 10यावर ‘काही हरकत नाही, मी वाट पाहीन,’ असे नोरा म्हणाली. आता नोराची ही इच्छा पूर्ण होते की नाही बघूच. (Photo Instagram) 7 / 10नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram) 8 / 10वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमात दिसली होती. (Photo Instagram) 9 / 10लवकरच ती ‘भुज’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram) 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications