Join us

ऐश्वर्या रायचा राणीच नाही तर या सेलेब्ससोबत आहे ३६चा आकडा, चेहरा पाहिला तरी होते लालबुंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:49 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तशी फारशी कोणाशी बोलत नाही पण इंडस्ट्रीत तिचे असे काही शत्रू आहेत, ज्यांना पाहिल्यावर देखील तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. चला तर मग जाणून घेऊयात, कोण आहेत ज्यांच्याशी ऐश्वर्याचा ३६चा आकडा
2 / 8
बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या राय ही साधी स्वभावाची असून ती कधीही सार्वजनिक ठिकाणी रागावताना दिसत नाही. पण, इंडस्ट्रीत तिचे काहींसोबत जमत नाही
3 / 8
करिश्मा कपूर ही अभिषेक बच्चनची एक्स आहे. दोघांचे लग्न होणार होते. यानंतर ऐश्वर्या आणि करिश्मामध्ये कामावरून मतभेद झाले. दोघेही एकमेकांशी बोलणे टाळतात.
4 / 8
'चलते चलते' या चित्रपटात राणी मुखर्जीने ऐश्वर्या रायची जागा घेतली होती. यानंतर सलमान खानने चित्रपटाच्या सेटवर चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत नाहीत.
5 / 8
एका चित्रपटात ऐश्वर्याची जागा करीना कपूरने घेतली होती, ज्यानंतर ऐश्वर्याला करीना कपूर अजिबात आवडत नसल्याची चर्चा जोर धरू लागली. मात्र, नंतर करीना कपूरने ती चांगली मैत्रीण असल्याचे स्पष्ट केले. पण, ऐश्वर्या आणि करीना कधीच एकत्र दिसले नाहीत.
6 / 8
प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही प्रोजेक्ट्सवरून भांडण झाल्याची चर्चा होती. दोन्ही अभिनेत्रींमध्ये जाहिराती आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवरून भांडण झाले होते. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून दूर दिसतात.
7 / 8
एका ब्रँड इव्हेंटदरम्यान सोनम कपूरने ऐश्वर्या रायला आंटी म्हटले, ज्यामुळे ऐश्वर्याला खूप वाईट वाटले. तेव्हापासून ऐश्वर्या आणि सोनममध्ये शीतयुद्ध सुरू आहे.
8 / 8
सलमान खानचे ऐश्वर्या रायवर खूप प्रेम होते, त्यांचे नाते खूप घट्ट होते. पण अनेकवेळा सलमान खानने ऐश्वर्या रायसोबत सार्वजनिकरित्या गैरवर्तन केले, त्यामुळे ऐश्वर्याने सलमानसोबतचे नाते तोडले.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनराणी मुखर्जीकरिश्मा कपूरकरिना कपूरसोनम कपूरसलमान खान