'National Handloom Day' निमित्त दिया मिर्झाने शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांनी केलं कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 5:01 PM1 / 8'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.2 / 8दिया मिर्झाने 'लगे रहों मुन्ना भाई', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.3 / 8अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चित्रपटांपासून तशी दूरच आहे. पण सोशल मिडियावर ती बऱ्याचदा सक्रिय असते.4 / 8नुकतेच तिने 'National Handloom Day: 2024' निमित्त काही खास फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.5 / 8दियाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये भारतातील हातामाग उद्योगामध्ये असलेली वैविध्यता पाहायला मिळते. 6 / 8या फोटोंमधून भारताची संस्कृती, लोककला याची माहिती मिळते. प्रत्येक फोटोमध्ये दियाने हातापासून तयार केलेल्या (हातमागाच्या) वस्तुंसोबत फोटो क्लिक केले आहेत. 7 / 8एका फोटोमध्ये अभिनेत्रीने हॅडलूम सिल्क साडी नेसली आहे तर काही फोटोंमध्ये ती कुंभाराप्रमाणे हाताने मातीचे मडके घडवताना दिसते आहे. 8 / 8दिया मिर्झाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications