Then & Now: एका गोष्टीमुळे बरबाद झाले रोमँटिक हिरोचे करिअर, आता ओळखणेही झाले कठिण By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 10:26 AM1 / 9 दिसायला स्मार्ट असलेल्या चंद्रचूडला सुरुवातीला चांगल्या चांगल्या भूमिका मिळाल्या. 'तेरे मेरे सपने' या सिनेमातून त्याने 1996 साली रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. 2 / 9 त्याच वर्षी त्याचा 'माचिस' हा सिनेमाही रिलीज झाला होता. ''चप्पा चप्पा चरखा चले'' या गाण्यातील चंद्रचूड सिंह आजही रसिकांच्या लक्षात आहे. 3 / 9यानंतर त्याने 'दिल क्या करे', 'दाग द फायर', 'जोश', 'क्या कहेना' अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. बॉलीवुडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा चंद्रचूड सिंह हा आवडता अभिनेता होता. याची कबुली तिने एका कार्यक्रमात दिली होती. 4 / 9असं सगळं असतानाच अचानक चंद्रचूड सिंह याच्या उभरत्या करियरला कलाटणी मिळाली. दिग्दर्शकांनी त्याला सिनेमासाठी विचारणा बंद केली. 5 / 9त्याच दरम्यान 2000 साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचूड सिंहला अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. 6 / 9ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 15 वर्षे लागले. याच दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला त्याची सगळी कमाई खर्ची करावी लागली. 7 / 9 या खर्चामुळे त्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली. त्यामुळेच आता चंद्रचूड सिंहला कोणतंही काम मिळेनासं झालं आहे. 8 / 9सिनेमातील भूमिका तर सोडाच छोट्या पडद्यावरील भूमिकाही त्याला मिळेनाशा झाल्या आहेत.9 / 9परिणामी चंद्रचूड सिंहची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुणी काम देतं का काम असं म्हणायची वेळ त्याच्यावर आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications