Join us

Oscars 2021 Moment: नो स्पीच, नो म्युझिकल परफॉर्मन्स; पण ऑस्करची चर्चा होणारच...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 5:08 PM

1 / 8
कॅमेर बंद होताच मास्क बंधनकारक : कोरोना महामारीमुळे यंदाचा ऑस्कर सोहळा अगदी छोटेखानी होता. 225 देशांत हा सोहळा टेलिकास्ट केला गेला. सोहळ्यात 170 लोक सामिल झाले. यांना मास्क घालणे गरजेचे नव्हते. अर्थात कॅमेरे सुरू आहेत, तोपर्यंतच. यानंतर मास्क घालणे बंधनकारक होते.
2 / 8
रेजिना आली अन् ड्रेसमुळे गोंधळली : ऑस्कर सोहळ्यात कोणताही औपचारिक होस्ट नव्हता. रेजिना किंगने या सोहळ्याची ओपनिंग केली. रेजिना अगदी पेरिविंकल गाऊन घालून स्टेजवर आली आणि या लांबलचक गाऊनमध्ये अडकून पडली. होय, कसेबसे तिने स्वत:ला सांभाळले.
3 / 8
नो स्पीच... : ऑस्करला लांबलचक भाषणांची परंपरा आहे. पण हे भाषण सुरू असताना अनेक लोक खुर्चीवरून उठून बाहेर जात, वा गप्पा मारताना दिसत. यावर्षी या लांबलचक भाषणांना फाटा देण्यात आला. बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवार्ड जिंकणा-या फ्रान्सिस मेकडोरमँडनेही मोजक्या शब्दांत आभार व्यक्त केलेत.
4 / 8
आईबाबाने सेक्स केले म्हणूऩ़...: यंदा एका ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने कमाल केली. होय, जेनिअल कलुइया याने ऑस्कर जिंकला आणि भाषणात असे काही बोलला की, ऐकून त्याची आई सुद्धा हैराण झाली. माझ्या आईवडिलांनी सेक्स केले आणि मला जन्मास घातले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे तो म्हणाला.
5 / 8
नो म्युझिकल परफॉर्मन्स... : दरवर्षी ऑस्कर सोहळ्यात सिंगर्स एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स देतात. पण यावर्षी असे काहीही दिसले नाही. यंदा म्युझिकल परफॉर्मन्सला पूर्णपणे कात्री देण्यात आली. यासाठी खास प्री-शो ठेवला गेला.
6 / 8
अनेक इतिहास रचले...: यंदा ऑस्करने अनेक इतिहास रचलेत. यु जंग यूं ऑस्कर जिंकणारा पहिला कोरियाई अ‍ॅक्टर बनला. तर च्लोए झाओ बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर पटकावणारी दुसरी महिला ठरली.
7 / 8
मिया नील व जामिका विल्सन मेकअप व हेअरस्टाइलसाठी ऑस्कर जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली
8 / 8
मलायकाही या ड्रेसवर भाळली : स्पायडर मॅन अ‍ॅक्ट्रेस zendaya चा लूक ऑस्कर सोहळ्यातील बेस्ट लूक ठरला. तिने यॅलो कलरचा सुंदर गाऊन परिधान केला होता. सोबत 44 कोटी रूपयांची डायमंड ज्वेलरी घातली होती. अगदी तिचा हा ड्रेस बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरालाही आवडला.
टॅग्स :ऑस्कर