Join us  

पॅडी कांबळेची मुलगीही अभिनेत्री! वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून गिरवतेय अभिनयाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:28 PM

1 / 7
पॅडी कांबळे सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चांगला खेळ खेळून प्रेक्षकांचं मन जिंकतोय. पॅडीच्या मुलींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
2 / 7
पॅडी कांबळेला दोन मुली असून त्याच्या मोठ्या मुलीचं नाव आहे ग्रिष्मा तर धाकट्या लेकीचं नाव आहे आद्या. त्यापैकी मोठी लेक ग्रिष्मा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्र गाजवतेय.
3 / 7
ग्रिष्मा पंढरीनाथ कांबळे सध्या पुण्यातील नाट्यसंस्थेमधूनअभिनयाचे धडे गिरवत आहे.
4 / 7
ग्रिष्माच्या नाटकांचे अनेक प्रयोग मुंबई, पुण्यात होत असतात. ग्रिष्मा एक उत्तम नृत्यांगनाही आहे
5 / 7
ग्रिष्मा सोशल मीडियावर विविध आऊटफिटमध्ये सुंदर फोटोशूट करताना दिसते. याशिवाय बहिणीसोबत तिचे डान्स व्हिडीओही चर्चेत असतात
6 / 7
काही दिवसांपूर्वी जेव्हा जान्हवीने बिग बॉसमध्ये पॅडीचा अपमान केलेला तेव्हा ग्रिष्माने सणसणीत पोस्ट लिहून वडिलांची बाजू मांडली होती
7 / 7
अशाप्रकारे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन ग्रिष्मा कांबळे सुद्धा मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतेय
टॅग्स :भातबिग बॉस मराठीकलर्स मराठी