Join us

Jitendra Kumar : 'पंचायत' के सचिवजी! IIT नंतर केला बेरोजगारीचा सामना; 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:34 AM

1 / 11
'पंचायत' या वेबसीरिजमधील प्रत्येक पात्र खास आहे. ज्याची छोटीशी भूमिका आहे तोही मोठी छाप सोडतो. 'पंचायत 3' ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा नवीन सीझन आला आहे.
2 / 11
पंचायत 3 या वेब सीरिजमध्ये मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार असून त्याने सचिव ही भूमिका साकारली आहे. IIT नंतर त्याने बेरोजगारीचा सामना केला पण एका संधीने आयुष्य बदललं. त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेऊया...
3 / 11
जितेंद्र कुमारचा सुरुवातीपासूनच अभिनयाकडे कल नव्हता. तो आयआयटीचा विद्यार्थी आहे, त्याने आपलं शिक्षणही पूर्ण केलं आणि काही काळ एका आयटी कंपनीत कामही केले. पण काही महिने बेरोजगार राहिल्यावर तो अभिनयाकडे वळला.
4 / 11
जितेंद्रचा जन्म 1 सप्टेंबर 1990 रोजी राजस्थानमधील खैरथल येथे झाला. त्याने आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं. जितेंद्र कुमारला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती पण त्याने सिव्हिल इंजिनीअरिंगला आपलं करियर निवडलंय.
5 / 11
लहानपणी त्याने रामलीलामध्ये अभिनय केला होता आणि अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांचीही नक्कल केली होती. मात्र अभ्यासात तो खूप हुशार होता. जितेंद्र कुमारने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली जी सर्वात कठीण आहे.
6 / 11
जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. जितेंद्र कुमारचे वडील देखील बी.टेक इंजिनियर होते आणि त्याला देखील त्याच्या वडिलांसारखं बनायचं होतं.
7 / 11
जितेंद्रने The Viral Fever (TVF) चे कार्यकारी क्रिएटिव्ह डायरेक्टर विश्वपती सरकार यांची भेट घेतली. त्यावेळी ते जितेंद्र कुमारचे सीनियर होते पण विश्वपती सरकार यांनी त्याला TVF जॉईन करण्यास सांगितलं.
8 / 11
खरगपूरमधून उत्तीर्ण झाल्यानंतर, जितेंद्र 3 महिने बेरोजगार राहिला, नंतर त्याला बंगळुरूमध्ये स्थापन झालेल्या जपानी बांधकाम कंपनीत नोकरी मिळाली. पण त्यानंतर विश्वजित सरकार यांनी त्याला TVF साठी बोलावलं आणि जितेंद्र त्यांना भेटायला गेला.
9 / 11
जितेंद्रने तिथे 'मुन्ना जज्बाती' वेब सिरीज केली आणि तो हिट झाला. जितेंद्र कुमारने 'कोटा फॅक्टरी', 'बॅचलर', 'ड्राय डे', 'जादुगर', 'चमन बहार', 'पंचायत', 'ड्राय डे' यांसारख्या वेब सीरिज केल्या आहेत.
10 / 11
जितेंद्र कुमार आता OTT चा सुपरस्टार झाला आहे. त्याने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत.
11 / 11
टॅग्स :वेबसीरिज