Join us

३०० गावं फिरल्यानंतर मिळालं 'फुलेरा', 'भूता पेड' आहे तरी कुठे?; 'पंचायत'चे अजब किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:51 AM

1 / 7
ओटीटीवर सध्या सर्वात चर्चेतील वेबसीरिज 'पंचायत'(Panchayat). या सीरिजचा बहुप्रतिक्षित तिसरा भाग नुकताच रिलीज झाला आहे. 'पंचायत 3' ने यावेळी हसत हसतच रडवलं आहे. तसंच चौथ्या भागाचीही उत्सुकता वाढवली आहे.
2 / 7
या 'पंचायत'सीरिजमुळे 'फुलेरा' गाव चर्चेत आलं. तसंच सचिवजी, प्रधानजी, मंजू देवी, बनराकस, प्रल्हाद, विकास, विनोद हे पात्र गाजले. 'पंचायत'च्या शूटिंगचे अनेक अजब किस्से आता समोर आलेत.
3 / 7
'पंचायत' चं शूट मध्य प्रदेशमधील एका गावात झालं आहे. मात्र पंचायत ऑफिसची जागा शोधण्यासाठी टीमला बरेच कष्ट घ्यावे लागले. टीममधील सर्वच लोक जवळपास 300 गाव फिरले. तेव्हा कुठे एक गाव मिळालं. पण तिथला रस्ता खूपच खराब होता. त्यामुळे प्रोडक्शननेच गावात रस्ते बनवले आणि मग तिथे शूटिंग सुरु झालं.
4 / 7
'पंचायत' मधील सर्व कलाकरांनी लोकल मार्केटमधून घेतलेले कपडे परिधान केले आहेत. पण जेव्हा या स्वस्तातल्या कपड्यांना धुतलं तेव्हा ते आखडले गेले आणि खराब झाले. यामुळे कॉस्च्युम डिझायनर्सला कपड्यांसाठी पुन्हा कष्ट घ्यावे लागले.
5 / 7
सीरिजचं शूट उन्हाळ्यात झालं आहे. पण जेव्हा सीझन १ मध्ये प्रजासत्ताक दिनाचा सीन शूट होत होता तेव्हा सर्व कलाकारांना स्वेटर घालावे लागले. ४० डिग्री तापमानातही कलाकार स्वेटर घालून होते. कारण २६ जानेवारी वेळी हिवाळा असतो. त्यामुळे त्यांना स्वेटरमध्येच दाखवावं लागलं.
6 / 7
सीरिजमध्ये 'भूता पेड'ही दाखवण्यात आलंय. याचा शोध घेणंही खूप कठीण होतं. अर्धा शो शूट झाला पण असं झाड मिळत नव्हतं. अखेर टीमने ब्रेक घेतला आणि सगळे वेगवेगळ्या दिशेला झाड शोधण्यासाठी गेले. शेवटच्या दिवशी हे झाड मिळालं आणि दोन रात्रीत भूता पेडचा सीन शूट झाला.
7 / 7
पंचायत मध्य प्रदेशच्या ज्या गावात शूट झालं त्याचं खरं नाव भलतंच आहे. तर फुलेरा नावाचं गाव राजस्थानात आहे. पण सीरिज मध्य प्रदेशमधील सिहोरच्या महोदिया गावात शूट झाली आहे.
टॅग्स :वेबसीरिजमध्य प्रदेशनीना गुप्ता