Join us

Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 2:10 PM

1 / 7
परवीन बाबी भारतीय सिनेमामध्ये महिलांच्या रूढीवादी वागण्याला तडा देणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. ७० च्या दशकात जेव्हा अभिनेत्री सलवार सूट आणि साड्यांमध्ये दिसत होत्या तेव्हा परवीन बाबी आपला बोल्ड अंदाज दाखवत होत्या. तीन दशकं मोठ्या पदद्यावर दमदार काम केल्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये अभिनेत्री परवीन बाबीचं निधन झालं. आज तिचा स्मृती दिन आहे. चला जाणून घेऊ तिच्याबाबत.
2 / 7
परवीन बाबीचा जन्म ४ एप्रिल १९४९ मध्ये सौराष्ट्रातील जूनागढमध्ये एका मध्यम वर्गीय मुस्लिम परिवारात झाला होता. सेंट झेविअर्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून बीए केल्यावर परवीन बाबी मॉडलिंगमध्ये करिअर करत होती. तेव्हाच परवीनची भेट सिने दिग्दर्शक बीआर इशारा यांच्यासोबत झाली.
3 / 7
असं सांगितलं जातं की परवीन बाबीला सिगारेट ओढताना पाहून बीआर इशारा यांनी ठरवलं होतं की, ही त्यांची हिरोईन बनेल. बीआर इशारा यांनी परवीनला पहिल्यांदा क्रिकेटर सलीम दुर्रानीसोबत १९७३ मध्ये रिलीज झालेल्या 'चरित्र' सिनेमात संधी दिली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवला नाही, पण परवीन बाबी प्रेक्षकांच्या मनात बसली.
4 / 7
परवीन बाबीची लव्ह लाइफ फारच वादग्रस्त ठरली होती. कथितपणे परवीन बाबीचं पहिलं अफेअर डॅनीसोबत होतं. एका मुलाखतीत डॅनीने सांगितलं होतं की, साधारण चार वर्ष त्याने परवीन बाबीला डेट केलं. पण दोघांचं नातं पुढे टिकू शकलं नाही. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदी आला.
5 / 7
परवीन आणि कबीर तीन वर्ष सोबत राहिले. पण हेही नातं टिकलं नाही. त्यानंतर दुख:त असलेल्या परवीन बाबीला महेश भट्टचा आधार मिळाला. महेश भट्ट तेव्हा विवाहित होते. पण त्यांचं अफेअर सुरू होतं. महेश भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये असताना परवीन बाबील पॅरानायड स्कित्जोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला.
6 / 7
अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. एक काळ असाही होता जेव्हा दोघांच्या अफेअरची अफवा उडाली होती. जेव्हा मीडियाला याची भनक लागली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हे तिच्यापासून दूर राहणं पसंत केलं. नंतर परवीनने आरोप लावला होता की, अमिताभने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो एक आंतरराष्ट्रीय गॅंगस्टर आहे.
7 / 7
परवीनने दावा केला होता की, अमिताभ बच्चन तिचं अपहरण करून एका बेटावर घेऊन गेला होता. जिथे अमिताभने तिची सर्जरी केली आणि तिच्या उजव्या कानाखाली एक ट्रान्समीटर किंवा चीप लावली होती. अभिनेत्रीने अमिताभ विरोधात तक्रारही दिली होती. त्याना कोर्टात खेचलं होतं. पण जेव्हा परवीनच्या पॅरानायड स्कित्जोफ्रेनियाबाबत समजलं तेव्हा सगळे आरोप फेटाळण्यात आले होते.
टॅग्स :परवीन बाबीबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स