Join us

Pathaan : वादग्रस्त गाणं 'बेशरम रंग'वर शाहरुख खाननं सोडलं मौन, म्हणाला - 'दीपिका पादुकोण सारखं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:10 IST

1 / 7
पठाण काही दिवसात रिलीज होणार आहे, ज्यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमची अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.
2 / 7
चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच एक व्हिडीओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान वादग्रस्त गाणे बेशरम रंगबद्दल बोलताना दिसत आहे.
3 / 7
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
4 / 7
दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. खरं तर, यशराज फिल्म्सने जारी केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणताना दिसतो की, 'बेशरम रंग सारखे गाणे करण्यासाठी दीपिकासारख्या सक्षम व्यक्तीची गरज आहे. म्हणायचे तर हा एक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका अतिशय थरारक आहे.
5 / 7
पठाणची दोन गाणी रिलीज झाली आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान आणि स्पेनच्या बीचवर दीपिका यांचा रोमान्स करणारे पहिले गाणे 'बेशरम रंग' रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे.
6 / 7
या गाण्याच्या सीन्सवर काही लोकांचा आक्षेप आहे, तर बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधामुळे काही लोक या गाण्याला विरोधही करत आहेत.
7 / 7
मात्र, असे असूनही या गाण्याला खूप व्ह्यूज मिळाले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.
टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोण