काम मिळण्यासाठी अभिनेत्री करायची काळी जादू, स्वत: केला होता खुलासा, कोण होती ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:48 IST
1 / 10असे अनेक स्टार आहेत जे काळी जादू किंवा तंत्र-मंत्र या प्रकराला बळी पडले. 2 / 10 या यादीत एका अभिनेत्रीचा समावेश होता. जिने बॉलीवूडमध्ये करिअर व्हावे म्हणून काही अघोरी उपाय केले होते. 3 / 10विशेष म्हजे याची कबुली तिनं स्वत: दिली होती. ती अभिनेत्री आहे पायल रोहतगी. 4 / 10पायल रोहतगी ही कंगना राणौतच्या 'लॉक अप' या शोमध्ये सहभागी झाली होती. 5 / 10यावेळी शोमध्ये पायल रोहतगीनं एक धक्कादायक खुलासा केला होता. 6 / 10'लॉक अप' शोमध्ये 'जजमेंट डे'च्या दिवशी कंगना हिनं सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सत्य सांगण्यास सांगितलं होतं. 7 / 10पायलनं तेव्हा खुलासा केला की, 'माझं करिअर चांगलं व्हावं यासाठी काही वेगळया मार्गांचा अवलंब केला. त्यामध्ये वशीकरण आणि काळ्या जादुचाही समावेश होता'. 8 / 10पायलनं त्या गोष्टीचा फारसा फायदा झाला नसल्याचंही सांगितलं होतं. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 9 / 10पायल रोहतगीने २००२मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर, ती २००६मध्ये '३६ चायना टाऊनटमध्येही दिसली.10 / 10मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. तसेच ती 'बिग बॉस'मध्येही सहभागी झाली होती.